बेळगाव येथील 11 व्या जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रमाकांत चव्हाण यांनी साक्षीदारातील विसंगतीमुळे तब्बल 31 संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.2010 मधील चव्हाट गल्लीतील दंगलीचा खटला 12 वर्षे चालला होता या दंगलीत अनेक पोलीस जखमी झाले होते होते.
या घटनेची अधिक माहिती अशी की 6 नोव्हेंबर 2011 म्हणजेच दिवाळीच्या लक्ष्मीपूजना दिवशी रात्री 10 वाजता इम्रान मोकाशी नावाचा युवक चव्हाट गल्ली येथील त्याचा मित्र सुशांत याला भेटायला क्रांती सिंह नाना पाटील चौकात आला होता त्यावेळी चव्हाट येथील काही युवकांनी अडवून आमच्या गल्लीत कशाला येतोस असे सांगत मारबडव केली होती. त्यानंतर इमरान मोकाशी याचे खंजर गल्लीतील मित्र दिशान पटेल आणि मेहबूब खलिफा हे दोघे जाब विचारायला चव्हाट गल्लीत गेले असता त्यांनादेखील मारबडव करण्यात आली होती.
या घटनेनंतर दोन गटात क्रांती सिंह नाना पाटील चौकात तुंबळ दगडफेक,हाणामारी झाली होती या घटनेत पोलिसांच्या अनेक गाड्यांना फोडण्यात आल्या होत्या नंतर तब्बल 21 पोलीस जखमी झाले होते. विशेष म्हणजे तात्कालीन मार्केट पोलीस निरीक्षक रामनगौडा हट्टी आणि उपनिरीक्षक चन्नकेशव टेंगरीकर या दोघांना देखील दुखापत झाली होती पोलिसांची अनेक वाहने फोडण्यात आली होती
यानंतर पोलीस निरीक्षकांनी मार्केट पोलीस स्थानकात चव्हाट गल्ली दरबार गल्ली परिसरातील दोन्ही समाजाच्या युवकांवर विरोधात फिर्याद दाखल केली होती त्यानुसार 31 जणांवर आयपीसी कलम 143,147,148,353,332,337,338,307 आणि 427 ,153 अ, सह कलम 149 सह दोषारोपपत्र दाखल केले होते.
सरकारी पक्षातर्फे संशयित आरोपींवरील दोषारोप सिद्ध करण्यासाठी जवळपास 25 आरोपींची साक्ष तपासण्यात आली होती पण सरकारी पक्षाला गुन्हा साबित करता न आल्याने तसेच साक्षीदारातील विसंगतीमुळे संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.सदर खटला बारा वर्षे चालला, संशयित आरोपीच्या वतीने वकील प्रताप यादव वकील एल के गुरव वकील एस बी मुतगेकर यांनी काम पाहिले.
सचिन गरडे,आरिफ कोतवाल, मैनोद्दीन खानापुरे, फ़हींम मेस्त्री फहिम कोतवाल, मोहम्मदशफी ताशीलदार,इनायत निजामी,नासिर खानापूरे,सुरज भोसले,संतोष अनगोळकर,किशोर सायने,निलेश खांडेकर,सूरज धमुने,अनिस भडकली, सुरेश सुतार, भूषण निर्मळकर, राघवेंद्र येळळूरकर, सचिन कोळेकर,पेरमळ जालगार,विजय जालगार,धनंजय जाधव,संतोष अक्केतंगेरहाळ,रमाकांत कोंडूसकर,आप्पाजी पार्वती,सुरेश येरजरवी, प्रशांत नायक ,किरण जाधव, विनायक रेडेकर मारुती शहापूरकर मोहन पाटील आणि गणपती होसमनी या 31 जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे.