Sunday, January 5, 2025

/

बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पदवीधर मतदार

 belgaum

वायव्य पदवीधर मतदार संघाच्या व्याप्तीत विजयपुर बेळगाव बागलकोट हे तीन जिल्हे येतात या तीन जिल्ह्यांपैकी बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पदवीधर मतदार आहेत. त्यामुळे निवडणुकीत बेळगाव जिल्ह्याची मते निर्णायक ठरणार आहेत.

वायव्य पदवीधर मतदार संघातील एकूण पदवीधर मतदारांची संख्या 73 हजार 509 इतकी आहे. यापैकी बेळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 31 हजार 293 पदवीधर आहेत. त्यातुलनेत बागलकोट जिल्ह्यामध्ये 27 हजार 196 आणि विजयपूर जिल्ह्यामध्ये 15 हजार 20 पदवीधर मतदार आहेत.

वायव्य पदवीधर मतदार संघातील निवडणूक येत्या मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये तीन जिल्ह्यांपैकी बेळगाव जिल्ह्यातील मतदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे पंचम साली समाजाचे प्रभावी युवा नेते किरण साधुनावर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आला असला तरी याबाबतची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

पदवीधर मतदार संघातील काँग्रेस उमेदवार किरण साधूनावर यांनी आत्तापासूनच बेळगाव, बागलकोट आणि विजयपूर जिल्ह्यामध्ये निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी आवश्यक तयारी करण्याबरोबरच त्यांनी मतदारांशी संपर्क साधण्यास देखील सुरुवात केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील तालुकावार पदवीधर मतदारांची संख्या ध्यानात घेता सर्वाधिक म्हणजे 2582 मतदार अरभावी क्षेत्रात आहेत.

याखेरीज निपाणीमध्ये 1453, चिकोडी -सदलगा येथे 2523, अथणी येथे 1790, कागवाड येथे 1785, कुडची येथे 1850, रायबाग येथे 1089, हुक्केरी येथे 2094, आणि यमकनमर्डी क्षेत्रात सर्वांत कमी म्हणजे 474 पदवीधर मतदार आहेत. त्याचप्रमाणे बेळगाव उत्तरमध्ये 1909, बेळगाव दक्षिणमध्ये 1887, गोकाकमध्ये 2582, खानापूरमध्ये, 948, बेळगाव ग्रामीणमध्ये 1021 कित्तूरमध्ये 1201, बैलहोंगलमध्ये 2135, सौंदत्तीमध्ये 1759 आणि रामदुर्गमध्ये 2213 मतदार आहेत. या पद्धतीने बेळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 31 हजार 293 पदवीधर मतदार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.