फेब्रुवारीमध्ये अपेक्षित असलेल्या तिसऱ्या लाटेच्या उच्चांक काळात कर्नाटकात कोविड-19 चे 1.2 लाख दैनंदिन रुग्ण आढळू शकतात. यापैकी 90-94 टक्के रुग्ण होम आयसोलेशन मध्ये ठेऊन बरे करावे लागणार आहेत.
साथीच्या रोगाच्या पहिल्या दोन लहरींदरम्यान जी रणनीती अवलंबण्यात आली होती त्यापेक्षा वेगळी नसली तरी,राज्य आरोग्य अधिकारी घरी विलग असलेल्यांना तपासण्यासाठी आक्रमक उपाययोजना करत आहेत. त्यांच्या मोहिमेचा एक भाग म्हणून, ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि जे होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांच्या आरोग्याची स्थिती आणि स्थान तपासण्यासाठी वेगवेगळ्या टीमकडून अधिक लक्ष ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.
फेब्रुवारीमध्ये दररोज 1.2 लाख प्रकरणांची संख्या गाठण्याची शक्यता आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स IISc च्या संशोधकांनीही असाच अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या सर्वांना वैद्यकीय किट अनिवार्यपणे देण्यात येत आहेत.अशी माहिती राज्य आरोग्य आयुक्त डी रणदीप यांनी सांगितले.
नोडल ऑफिसर पंकज कुमार पांडे यांनी सांगितले की, दुसऱ्या लाटेप्रमाणेच या वेळीही वैद्यकीय अभ्यासक्रम शिकणाऱ्या पाचव्या सेमिस्टरच्या 10,000 वैद्यकीय विद्यार्थ्यांना कोविड-संबंधित कामात सहभागी करून घेतले जाईल.
फेब्रुवारीत एका वेळी आठ लाख लोक होम आयसोलेशनमध्ये असू शकतात म्हणून सर्व तयारी केली जात आहे. या वर्षी आतापर्यंत 80,000 लोकांशी टेलि-ट्रायजिंगद्वारे संपर्क साधण्यात आला आहे. तसेच, अधिकाऱ्यांनी 300 ते 400 रुग्णांच्या घरी भेटी दिल्या आहेत.
दुसऱ्या लाटेदरम्यान, होम क्वारंटाईनमध्ये असलेल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी १.३३ लाख कॉल करण्यात आले. तसेच, 36,053 रूग्णांना मानसिक आरोग्य समुपदेशन देण्यात आले, 1.96 लाख आपत्कालीन परिस्थिती ओळखण्यात आल्या आणि ज्यांची सर्वात जास्त गरज आहे त्यांच्यासाठी 8.08 लाख रूग्णालयातील खाटा मोकळ्या करण्यात आल्या.यावेळीही असेच युद्ध पातळीवरील काम होणार आहे.