Daily Archives: Jan 23, 2022
बातम्या
एकाच रात्रीत सहा घरफोड्या : 10 लाखाचा ऐवज लंपास
यमगर्णी (निपाणी) गावात एका रात्रीत सहा घरफोड्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून या धाडसी चोरीमध्ये चोरट्यांनी 10 तोळे सोने आणि 2 लाखाची रोकड असा सुमारे 10 लाखाचा ऐवज लंपास केला आहे. चोरट्यांच्या या प्रतापामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले...
बातम्या
‘एनडीं’चे आयुष्य वंचितांच्या न्याय हक्कासाठी खर्ची : पाटील
दिवंगत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आपले सारे आयुष्य सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि वंचितांच्या न्याय हक्कासाठी समर्पित केले. त्यांनी अनेक आंदोलने चळवळी केल्या. अन्यायाच्या विरोधात लढून महाराष्ट्राला वेगळी दिशा दाखविली. त्याचबरोबर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न संबंधीच्या प्रत्येक लढ्याचे नेतृत्व केले,...
बातम्या
‘आरएसजे’तर्फे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या टीम राहुल सतीश जारकीहोळी (आरएसजे) यांच्यातर्फे कडोली (ता. जि. बेळगाव) येथे कोरोना संदर्भात जनजागृती करण्याबरोबरच आयोजित केलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर उस्फुर्त प्रतिसादात पार पडले.
टीम राहुल सतीश जारकीहोळी (आरएसजे) यांच्यातर्फे आज रविवारी बेळगाव तालुक्यातील कडोली...
बातम्या
खासबागात कोरोनाला निमंत्रण देणारी गर्दी
देशातील कर्नाटकसह पाच राज्यात कोरोना संक्रमणाचा वेग वाढत असतानाही राज्य सरकारने शनिवार व रविवारी लागू करण्यात आलेला विकेण्ड कर्फ्यु मागे घेतला आहे. परिणामी शहरातील खासबागच्या रविवारच्या आठवडी बाजारात आज रविवारी पुन्हा एकदा खरेदीसाठी प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली. कोरोनाला...
बातम्या
पोलीसांसाठी रोगप्रतिकारक औषध वितरण
पोलीस दलात देखील कोरोना बाधितांची संख्या वाढली असल्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी डाॅ. श्रीनिवास पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडे नुकतीच आयुर्वेदिक औषधे सुपूर्द केली.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेवेळी येथील प्रोजेन रिसर्च लॅबचे डाॅ. श्रीनिवास पाटील यांनी...
बातम्या
बेळगाव शिवसेनेतर्फे गरजूंना मास्क, ब्लँकेट्सचे वाटप
बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे आज रविवारी हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख मान. बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना फेसमास्क आणि ब्लॅंकेट वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्या नेतृत्वाखाली...
विशेष
‘साहित्यिकांवर लिहिल्याने साहित्यिक पुरस्कार’.. मिळाली नवी ऊर्जा
साहित्यप्रेमींनी उशिरा का होईना मला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. यात भर म्हणून आता वाड्मय चर्चा मंडळाचा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे मला आणखी चांगले लिखाण करण्याची ऊर्जा मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया बेळगावचे लेखक, साहित्यिक व शिक्षक रणजीत चौगुले यांनी व्यक्त...
बातम्या
आता 20 डॉक्टर्स, 45 कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’
बीम्स हॉस्पिटल आणि नर्सिंग कॉलेजमधील 45 कर्मचाऱ्यांसह 20 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सर्वांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चांचण्या वाढविण्याची सूचना असल्याने पोलीस आणि सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची...
बातम्या
फसवणूक प्रकरणी कंपन्यांची माहिती देण्याचे आवाहन
झटपट पैशाच्या मोहापायी गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या कांही कंपन्यांविरुद्ध गेल्या महिन्यात जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या पुढाकारातून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आता या प्रकरणी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात...
शैक्षणिक
*इंडियन ऑइल आणि मध्य रेल्वेत नोकरीची संधी*
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 570 जागांसाठी भरती
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या एकुण 570 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...