26 C
Belgaum
Saturday, June 3, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 16, 2022

हे दांपत्य ठरले उत्तर कर्नाटकातील सर्वोत्कृष्ट वास्तुविशारद

बेळगाव शहरातील आदर्श मुचंडी व प्रिया मुचंडी या दाम्पत्याला भारतीय काँक्रीट संस्था आणि अल्ट्राटेक सिमेंट्स कडून उत्तर कर्नाटकासाठी सर्वोत्कृष्ट वास्तुविशारद पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. घटप्रभा येथे निर्माण केलेल्या निवासी इमारतीसाठी कर्नाटकचे लघु व मध्यम उद्योग मंत्री मुर्गेश नीराणी यांच्या...

रुबेला लस टोचलेल्या तीन बालकांचा मृत्यू

रामदुर्ग तालुक्यातील सालहल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुबेला लसीकरण केलेल्या १७ बालकांपैकी तीन बालकांचा शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेदरम्यान मृत्यू झाला. उपचारांसाठी दाखल करण्यात आले असता बेळगाव जिल्हा रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. लस दिल्यानंतर काही मिनिटांतच बाळांची प्रकृती गंभीर झाली...

महिलेचा संकेश्वरात गोळ्या झाडून खून

व्याजि धंदा करणाऱ्या महिलेचा भरदिवसा गोळ्या झाडून खून केल्याची घटना संकेश्वरमध्ये  रविवारी घडली. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली असून पोलीस तपास सुर आहे. हुक्केरी तालुक्यातील संकेश्वरमध्ये रविवारी एका महिलेची डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ५६ वर्षीय शैला निरंजन सुभेदार असे हत्या झालेल्या...

इथे करावा लागला टॅंकरने पाणी पुरवठा

पाणी पुरवठा विभागाच्या व्हॉल्वमन आणि इतर कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे पाणीपुरवठ्याची दैना उडाली आहे. वेगवेगळ्या भागात पाण्यासाठी नागरिकांना दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे . मात्र वार्ड क्रमांक 10 मधील नगरसेविकेने आपल्या भागातील नागरिकांसाठी टँकरने पाणीपुरवठा उपलब्ध केला असून यामुळे नगरसेविकेची...

मास्क घाला म्हणतच डॉक्टर मॅडम भडकल्या

विकेंड कर्फ्यू सुरू झाला आणि शुक्रवारी सकाळपासूनच पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांना थांबवणे, वाहनांची नाकेबंदी व दंडात्मक कारवाई सुरू केली होती. रविवारी बेळगावातील चन्नम्मा सर्कल येथे डॉक्टरांनी पोलिस अधिकाऱ्यांनाच मास्क घालण्याची विनंती केली. डीसीपीसह पोलीस अधिकाऱ्यांशी काही काळ वाद घातला...

पाण्यासाठीच्या लढाईत कर्नाटकाला या समस्या- वाचा बेळगाव live चा ग्राउंड रिपोर्ट

म्हादयी नदीपात्रातील कळसा-भांडुरा प्रकल्प कर्नाटक आणि गोवा यांच्यातील वादामुळे अपूर्ण राहिला आहे. पूर्ण झाल्यास धारवाड आणि गदग जिल्ह्यांना पिण्याच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा होऊ शकते. मात्र, या मुद्द्याचा वापर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी मते मिळविण्यासाठी केला आहे. लोकसभा...

भ्रष्टाचाराचे पुरावे जाहीर केल्यास सरकार कोसळेल: हा दावा पडू शकतो महागात

भ्रष्टाचाराचे पुरावे जाहीर केल्यास सरकार कोसळेल: हा दावा पडू शकतो महागात- कर्नाटक स्टेट कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने शनिवारी चेतावणी दिली की सार्वजनिक बांधकामातील 40 टक्के कमिशनच्या आरोपांशी संबंधित पुरावे जाहीर केले तर ते कर्नाटकातील बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारसाठी मृत्यूची...

कर्नाटकातील 18 लाख जणांना मिळणार केंद्राच्या गृहनिर्माण योजनेचा लाभ

कर्नाटकातील एकूण 18.78 लाख बेघर लोकांना आणि निवासी जागा नसलेल्या 6.61 लाख जणांना दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने कर्नाटकमधील गृहनिर्माण विभागाचा डेटा समक्रमित करण्यास सहमती दर्शविली आहे. आवास प्लस सॉफ्टवेअरवर डेटा अपलोड होत नसल्याने केंद्र सरकारने प्रकल्प प्रलंबित ठेवला...

फेब्रुवारीमध्ये कर्नाटकातील कोविड रुग्णसंख्या जाणार दिवसा एक लाखावर! पहा या संस्थेने केलाय दावा

फेब्रुवारीमध्ये अपेक्षित असलेल्या तिसऱ्या लाटेच्या उच्चांक काळात कर्नाटकात कोविड-19 चे 1.2 लाख दैनंदिन रुग्ण आढळू शकतात. यापैकी 90-94 टक्के रुग्ण होम आयसोलेशन मध्ये ठेऊन बरे करावे लागणार आहेत. साथीच्या रोगाच्या पहिल्या दोन लहरींदरम्यान जी रणनीती अवलंबण्यात आली होती त्यापेक्षा वेगळी...

इयत्ता १ ते ९ वीच्या शाळा उद्यापासून पुन्हा सुरू

11 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीत इयत्ता 1 ते 9 वीच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले होते. जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी आढावा घेऊन या आदेशात बदल करण्यात आला आणि इयत्ता 1 ते 9 वी साठी सोमवार, 17...
- Advertisement -

Latest News

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे दिल्ली प्रतिनिधी अभिषेक जाधव यांचा सत्कार

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून बेळगावचे अभिषेक जाधव यांची नियुक्ती झाली असून अभिषेक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !