बेळगाव ते धारवाड व्हाया कित्तूर या नवीन रेल्वे लाईन ला परवानगी मिळाली असली तरी या टप्प्यातील सुपीक जमिनी देणार नाही असा पवित्रा शेतकर्यांनी घेतला आहे.
त्याविरोधात सुपीक शेतजमिनीच्या मालक असलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी बेळगावात मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून...
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असहाय्य अवस्थेत बसून असलेल्या एका निराधार वृद्धाला आज हेल्प फाॅर नीडी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आसरा मिळवून दिला.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये आज सकाळी एक निराधार वृद्ध असहाय्य अवस्थेत बसून होता. याबाबतची माहिती मार्केट पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस...
बेळगाव जिल्ह्यामध्ये आज शनिवारी नव्याने 10 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 102 झाली आहे.
जिल्ह्यात आज आणखी 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले असून 4 जणांना कोरोना मुक्त झाल्याने हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नव्याने...
बेळगाव शहरातील सेव्हन्टीन ट्रेकर्स बेळगाव हा पदभ्रमंती करणाऱ्या युवकांचा समुह सालाबादप्रमाणे यंदा आयोजित किल्ले ढाकचाभैरी गोरक्षगड ते सिद्धगड माचिंद्रीगड मार्गे जीवधन गड पदभ्रमंती मोहीमेवर आज रवाना झाला.
सेव्हन्टीन ट्रेकर्सच्या पदभ्रमंती मोहीमेला बेळगाव, पुणे, कामशेत, जांभवली, कल्याण, मोरबाड, आकेफाटा, जुन्नर मार्गे...
कर्नाटक विधान परिषद सदस्यपदी निवड झालेल्या नूतन सदस्यांचा शपथविधी सोहळा येत्या गुरुवार दि. 6 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता विधानसौध बँक्वेट हॉलमध्ये होणार असल्याची माहिती विधान परिषदेचे उपसचिव बी. ए. बसवराजू यांनी दिली आहे.
राज्यातील 25 विधानपरिषद जागांसाठी गेल्या...
मागील दोन वर्षात बेळगाव जिल्ह्याला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूच्या जीवघेण्या प्रादुर्भावावर दृष्टीक्षेप टाकला असता 2021 च्या एप्रिल, मे आणि जून महिन्यात कोरोनाने सर्वाधिक लोकांना आपले शिकार केले. गेल्या मे महिन्यात तर पॉझिटिव्ह रुग्ण संख्येने तब्बल 30 हजाराचा टप्पा ओलांडला...
बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांची तडकाफडकी बेंगलोरला बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पोलीस आयुक्त म्हणून डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची नेमणूक करण्यात आली आहे. नूतन पोलीस आयुक्त म्हणून आज शनिवारी सायंकाळी डॉ. बोरलिंगय्या यांनी आपल्या अधिकार...
दुचाकी दुभाजकाला आदळल्याने झालेल्या अपघातात एक युवक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बी एस येडीयुरप्पा रोडवर घडली आहे.शुक्रवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान जुने बेळगाव नाक्याजवळ ओल्ड पी बी रोडवर हा अपघात झाला आहे.
ओमकार लक्ष्मण गडकरी वय...
महाराष्ट्र एकीकरण समितीवर राज्यात बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत असली तरी महाराष्ट्र एकीकरण समितीची एकंदर रचना पाहता तिच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेणे तितके सोपे नाही. समिती ही ना राजकीय पक्ष आहे ना नोंदणीकृत संघटना, त्यामुळे तिच्यावर बंदी घालणे...
राजस्थानमधील मद्रास रेजिमेंटच्या मिलिटरी कॅम्प येथे काल शुक्रवारी रात्री झालेल्या रस्ते अपघातात बेळगाव तालुक्यातील इदलहोंड गावाचे जवान बाळाप्पा तानाजी मोहिते (वय 32) हे मृत्युमुखी पडले.
अलीकडेच हवालदार हुद्यावर बढती मिळालेल्या मयत बाळाप्पा मोहिते यांची राजस्थान येथील मद्रास इंजीनियरिंग रेजिमेंट येथे...