संपूर्ण कर्नाटक राज्यावर सध्या 60000 रुग्णांचा केसलोड आहे, तर त्यापैकी फक्त 117 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. अशी माहिती उपलब्ध झाली आहे. मागील लाटेप्रमाणे केसलोडचा ताण अद्याप आयसीयुवर वाढला नाही ही समाधानाची बाब आहे.
त्यामुळे कोरोना झाल्यानंतर घाबरून जाण्यापेक्षा सावधगिरीने...
लहान मुलांना कोरोनाची लक्षणे दिसण्याचे प्रमाण कर्नाटकात सर्वाधिक बेळगाव जिल्ह्यात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. एका महिन्यात संपूर्ण राज्यभरात 860 विद्यार्थी आणि 85 शिक्षकांना कोरोना झाल्याचे दिसून आले आहे. शिक्षण खात्याच्या वतीने कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना ही आकडेवारी देण्यात आली...
बेळगाव जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक सुरू झाला असून आज बुधवारी जिल्ह्यात नव्याने 269 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे आज 13 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्ह्याप्रमाणे राज्यातही कोरोनाचा कहर झाला असून आज नव्याने तब्बल 21,390 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले...
बेळगाव शहरातील दोन्ही होलसेल भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर करावा, या मागणीसाठी नेगीलयोगी रयत संघातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज बुधवारी सकाळी नेगीलयोगी रयत संघातर्फे संघटनेचे राज्याध्यक्ष रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून जिल्हाधिकार्यांना निवेदन...
बेळगाव शहर पोलिस आता एका नव्या भूमिकेत दिसत आहेत. चक्क लाठी बाजूला ठेवून हातातील माईकद्वारे कोरोना आणि रहदारी नियमांसंदर्भात जनजागृती करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे.
गुन्हेगारांना सुतासारखे सरळ करणारी लाठी आणि पोलीस यांचे नाते अतूट आहे. हातात लाठी -काठी...
सांबरा येथील सिद्धकला क्रिकेट क्लबतर्फे आयोजित आणि आमदार पुरस्कृत 'आमदार चषक -2022' या मर्यादित षटकांच्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद सलमान स्पोर्ट्स पंत बाळेकुंद्री या संघाने हस्तगत केले. अंतिम सामन्यात सलमान स्पोर्ट्सने प्रतिस्पर्धी चांगळेश्वरी स्पोर्टस येळ्ळूर संघावर 52...
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन बंद ठेवण्यात आलेले जिल्ह्यातील सर्व माध्यमांचे इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे शालेयवर्ग येत्या 17 जानेवारीपासून पुनश्च सुरू केले जावेत, असा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जारी केला आहे.
राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि...
गेल्या डिसेंबर महिन्यात शहरातील अनगोळ येथील क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची मोडतोड केल्याप्रकरणी पोलिसांनी राजद्रोहासह विविध गुन्हे दाखल केलेल्या चार मराठी युवकांपैकी एकाला आठव्या जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असून अन्य एकाला अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
न्यायालयाकडून जामीन मंजूर...
राज्यशासनाने दारिद्र रेषेखालील (बीपीएल) शिधापत्रिकेसाठी अर्ज केलेल्या कुटुंबांना शिधापत्रिका वितरणासाठी 4 वर्षानंतर मंजुरी दिली आहे. त्यामुळे शिधापत्रिका वितरणाची ठप्प झालेली प्रक्रिया आता पुन्हा सुरू होणार आहे.
मागील चार वर्षापासून 2018 मध्ये विधानसभा निवडणूक, 2019 मध्ये लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर कोरोनाचा...
शाळा पूर्ववत सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहाराचे वाटप केले जात होते. मात्र आता कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे पुन्हा एकदा माध्यान्ह आहार वितरण थांबून त्याऐवजी धान्य वाटप करण्याचा विचार शिक्षण खाते करत असून येत्या दोन-चार दिवसात अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची...