22.3 C
Belgaum
Wednesday, June 7, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 3, 2022

सांबरा येथे क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

सांबरा (ता. जि. बेळगाव) येथील सिद्धकला क्रिकेट क्लब तर्फे आयोजित मर्यादित 8 षटकांच्या आमदार चषक ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला नुकताच उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेच्या आज झालेल्या सामन्यांमध्ये चव्हाटा शिनोळी, शिवसेना मुतगा आणि साई काकती या संघांनी विजय नोंदविले. सिद्धकला...

अंत्यसंस्काराच्या निमित्त्याने घडले ‘असे’ एकात्मतेचे दर्शन

एका निराधार मुस्लीम महिलेला एका ख्रिश्चन महिलेने आश्रय दिला आणि निराधार केंद्रातील त्या मुस्लिम महिलेवर अखेर हिंदू कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्कार केले, अशी दुःखद परंतु हिंदू -ख्रिश्चन -मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडविणारी घटना आज घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, गेल्या सुमारे 12...

हे आहे दीपक दळवींचे कर्नाटकाला आव्हान…..

कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समिती वर बंदी घालण्याची दर्पोक्ती करण्यापेक्षा महाजन अहवालानुसार सीमा प्रश्न सोडविण्यात यावा. अशी बाजू सुप्रीम कोर्टात मांडावी. असे थेट आव्हान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी कर्नाटक सरकारला दिले आहे. एकंदर निर्माण झालेल्या परिस्थिती...

मूलभूत नागरी सुविधांबाबत झाली अधिकाऱ्यांची बैठक

आगामी काळात मूलभूत सोयी सुविधांच्या बाबतीत शहरवासीयांकडून कोणत्याही तक्रारी येऊ नयेत, यासाठी आज आमदार ॲड. अनिल बेनके यांनी स्मार्ट सिटीसह संबंधित सर्व खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. आमदार ॲड. बेनके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरासह बेळगाव उत्तर मतदारसंघातील जवळपास सर्व...

आरटी -पीसीआर नसलेल्या बसेस धाडल्या माघारी

कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या आणि आरटी -पीसीआर प्रमाणपत्र असलेल्यांनाच फक्त कर्नाटकात प्रवेश दिला जाईल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी 2 जानेवारी रोजी बेंगलोर विमानतळावर बोलताना पत्रकारांना सांगितले. त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात असून कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरचा काल रात्री आरटी -पीसीआर प्रमाणपत्र...

रेल्वेमार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा; आंदोलन

गर्लगुंजी, नंदिहळ्ळी नागेनहट्टी आदी गावांनजीकच्या सुपीक जमिनीत उभारण्यात येणाऱ्या नियोजित रेल्वेमार्गाच्या विरोधात आज संबंधित भागातील शेतकऱ्यांनी रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. मोर्चाने शेकडोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन छेडून जोरदार...

‘त्यांची’ सुटका करा : माजी नगरसेवक संघटनेची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळा विटंबनेनंतर बेळगावात झालेल्या दगडफेक की प्रकरणी अटक करण्यात आलेल्या निरपराध मराठी युवक आणि हिंदू कार्यकर्त्यांवरील गुन्हे सरकारने त्वरित मागे घ्यावेत आणि जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना गजाआड करून कठोर शासन...

‘विमल’तर्फे बीम्समध्ये नूतनीकरण -पेंटिंग

कोरोनासह ओमिक्राॅनच्या वाढत्या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज होणाऱ्या जिल्हा प्रशासन आणि आरोग्य खात्याला सहकार्य करताना भाजप युवा नेते आणि विमल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण जाधव यांनी बीम्स हॉस्पिटलमधील एका विभागाचे मोफत नूतनीकरण व रंगरंगोटी करण्याची जबाबदारी उचलली आहे. कोरोनासह ओमिक्राॅन...

…हे आहे देवदूतांचे शहर

जीवनाचा प्रवास अनंत अडचणींनी भरलेला असतो, तो कधीच सरळ सुलभ राहत नाही. ही प्रेरणादायी कहाणी एका मुलीची आणि तिच्या कुटुंबाची (आई व मोठी बहीण) ज्यांनी आपले वडील /पतीला ऐन उमेदीच्या काळात गमावल्यानंतर एकत्रित एकसंध राहून येणाऱ्या प्रत्येक वादळावर समर्थपणे...

बेळगावात 9 रोजी मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगावतर्फे येत्या रविवार दि. 9 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता हिंदवाडीतील आनंदवाडी आखाड्यामध्ये मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. सदर कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी पै. नागराज बसीडोनी आणि पुण्याचा महाराष्ट्र चॅम्पियन...
- Advertisement -

Latest News

मंत्री सतीश जारकीहोळींचा भाजपाला टोला

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभाराची भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, सरकारचा कारभार नीट होत नसेल तर खुशाल...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !