समाजाला पुढे न्यायचं असेल तर स्त्री शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे ज्या समाजातील महिला सुशिक्षित झाल्या तो समाज सर्व दृष्टीने संपन्न झाला आहे.
काही मुलींना त्यांच्यात हुनर आणि कुवत असून सुद्धा आर्थिक कमकुवत पणामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागते.समाजातील या विसंगतीवर नेमकं काम करत बेळगावातील नियती फौंडेशनने एका शैक्षणिक दृष्ट्या सबल असणाऱ्या पण आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मुलीच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
सध्याच्या शिक्षणाला अपरिहार्य असणारा लॅपटॉपची मदत देत त्या विद्यार्थिनींची शैक्षणिक पायवाट सुखकर करण्याचा प्रयत्न नियती फौंडेशनने केलाय.त्या विद्यार्थिनीच्या आयुष्यातील नियतीचा मार्ग प्रकाशमान करण्याचा मार्ग नियती फौंडेशनने पार पाडला आहे.
वैष्णवी बसुरतेकर असे या गुणवंत विद्यार्थीनचे नाव असून
वसंतराव पोतदार तंत्रनिकेतन महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकत आहे. तिचे आईवडील तिला सध्या शैक्षणिक फी साठी पाठिंबा देऊ शकत नाहीत .आई वडिल दोघेही भाजी विक्रीचा व्यवसाय करत आपला उदरनिर्वाह करतात त्यामुळे नियती फौंडेशनच्या डॉ सोनाली सरनोबत यांनी पुढाकार घेत सदर मुलीला लॅपटॉप दिला.
नियती फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी शैक्षणिक फीसाठी सम गरजु विद्यार्थीनीना आर्थिक मदत करण्याचे आवाहान केले आहे.नियती फौंनडेशनच्या वतीने ह्या हुशार विद्यार्थीनीला तिला उपयुक्त ठरेल असा ‘ लॅपटॅाप दिला या कार्यक्रमाला डॉ समीर सरनोबत करसल्लागार संदीप खन्नुकर इंडियन रेल्वे टीमचे बॉडी बिल्डींग कोच सुनिल आपटेकर उपस्थित होते. त्यांनी देखील या गुणी विद्यार्थीनीच कौतुक केल .