म्हणतात की नवऱ्याने पळी चाटली तर लग्नात पाऊस पडतो..आज कृष्ण तुळशीचा विवाह साक्षात भगवान श्री कृष्णाने पळीतल्या भाताचा आस्वाद घेतला की काय अशी मजेशीर फिरकी पावसाची जनता घेत आहे.
मंगळवारी दुपारी पासुन दाटून आलेलं आभाळ सायंकाळी सहा वाजल्या पासून हळूहळू...
कोल्हापूर जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांनी संयुक्तरीत्या कालकुंद्री (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे आयोजित केलेल्या कोल्हापूर व बेळगाव जिल्हा मर्यादित शरीरसौष्ठव स्पर्धेतील मानाचा 'स्वराज्य श्री -2021' हा किताब बेळगावच्या प्रताप कालकुंद्रिकर याने पटकाविला. विशेष म्हणजे...
मोठ्या प्रमाणात खेकडे अचानक रस्त्यावर अवतीर्ण होऊन सैरावैरा धावू लागल्यामुळे स्थानिक लोकांवर आश्चर्यचकित होण्याची वेळ आल्याची घटना शहरातील माळी गल्ली कसाई गल्लीच्या कोपऱ्यावर घडली होती.
'खेकडा' हा जीव सर्वसामान्यपणे पाणथळ जागी, नदीकाठी, ओढ्या नाल्यांनानजीक अथवा पावसाळ्याच्या मोसमात शेतवाडीमध्ये आढळून येतो...
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आणि त्यांची तुलना आतंकवाद्यांची करणारे काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच त्यांनी लिहिलेल्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी बेळगावच्या हिंदू जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे...
बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या दोन्ही वकील उमेदवारांनी आज उपस्थित वकिलांना संबोधित करून आपापली बाजू मांडली.
बेळगाव न्यायालय आवारातील ॲडव्होकेट समुदाय भवनाच्या ॲड. डी. बी. दीक्षित सभागृहामध्ये आज दुपारी हा अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांसाठी संबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला...
04 -बेळगाव स्थानिक संस्थांच्या मतदारसंघातून कर्नाटक विधान परिषदेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकी संदर्भात निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांनी सूचना पत्र जारी केले आहे.
सदर सुचना पत्रानुसार निवडणूक लढवू इच्छुकांनी आपला उमेदवारी अर्ज स्वतः किंवा आपल्या प्रस्तावकाकडून मंगळवार दि. 23 नोव्हेंबरपर्यंत सार्वत्रिक...
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. तालुका समिती (एन डी गट )आणि तालुका समिती (बी आय गट) दोन्ही समित्यांच्या बैठक संयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येत्या गुरुवार दि....
शिवाजीनगर पहिली गल्ली पहिला मेन क्रॉस येथील फुटलेली मुख्य ड्रेनेज पाईपलाईन स्थानिक नूतन नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या पुढाकाराने दुरुस्त करण्यात आल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील शिवाजीनगर पहिली गल्ली पहिला मेन क्रॉस येथील नाल्याला जोडलेली मुख्य ड्रेनेज पाईपलाईन दिल्या...
त्रिपुरात मशिदी पाडल्याच्या अफवांच्या आधारे महाराष्ट्रात दंगल झाली जाळपोळ झाली याच्या निषेधार्थ तसेच रझा अकादमी या संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालावी, या मागणीसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे आज जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा अध्यक्ष किरण गावडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने...
हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम वेगाने सुरू असले तरी त्याच्याविरोधात शेतकरीदेखील ठाम असून आज सकाळी हालगा ब्रिजजवळ शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन छेडले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हालगा -मच्छे बायपासचे काम वेगाने सुरू ठेवले असले तरी शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...