Friday, April 19, 2024

/

‘गटारीतले खेकडे आणि खवय्यांचे नाक वाकडे’

 belgaum

मोठ्या प्रमाणात खेकडे अचानक रस्त्यावर अवतीर्ण होऊन सैरावैरा धावू लागल्यामुळे स्थानिक लोकांवर आश्चर्यचकित होण्याची वेळ आल्याची घटना शहरातील माळी गल्ली कसाई गल्लीच्या कोपऱ्यावर घडली होती.

‘खेकडा’ हा जीव सर्वसामान्यपणे पाणथळ जागी, नदीकाठी, ओढ्या नाल्यांनानजीक अथवा पावसाळ्याच्या मोसमात शेतवाडीमध्ये आढळून येतो हे सर्वश्रुत आहे. तथापि शहराच्या मध्यवर्ती भागात भरवस्तीत अचानक खेकडे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर रांगू लागले तर आपल्याला कसे वाटेल? पाहणाऱ्यांसाठी हा प्रकार धक्कादायकच असणार आहे. नेमका हाच प्रकार माळी गल्ली कसाई गल्लीच्या कोपऱ्यावर कसाई गल्ली येथे घडला.

या ठिकाणी अचानक मोठ्या प्रमाणात खेकडे रस्त्यावर इकडे तिकडे धावू लागल्यामुळे स्थानिक रहिवाशांना एकच धक्का बसला. त्यानंतर सर्वांचेच कुतूहल जागृत होऊन खेकड्यांचा उगम कुठून झाला हे पाहण्यासाठी रस्त्या शेजारील गटारीमध्ये शोध घेण्यात आला. खेकड्यांचा रस्त्यावरील उगम नेमका कुठून कसा झाला हे उशिरापर्यंत समजू शकले नसले तरी सदर प्रकार कसाई गल्ली व माळी गल्ली परिसरात चर्चेचा विषय बनला होता.

कसाई गल्लीच्या कोपऱ्यात खेकडे विक्रेते पोत्या मधून खकडे घेऊन नेहमीच विक्रीस बसतात खेकडे विक्रेत्यांची नजर चुकवून काही खेकड्यानी गटारींचा आश्रय घेतला होता आणि निसर्ग नियमाने खेकड्यांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैदास झाली.मनपा कर्मचाऱ्यांनी गटारी पूर्ण पणे साफ करताना खेकड्यांचा घरांना धक्का लागा आणि ते रस्त्यावर सैरावैरा धावू लागले.खेकड्यांची ही तिरकी चाल पाहून नागरिक अचंबित झाले होते.Crab kasai galli

माणसाची ज्यावेळी वेगळ्या वळणावर येते आणि त्याला वेगळं काही तरी चवीचं खावं असं वाटतं त्यावेळी माणूस परंपरागत खाद्य पदार्थ सोडून दुसऱ्या उकत्या अन्नाची अभिलाषा करतो आणि अश्या गंमती घडतात.

वास्तवात खेकडे हे चिखलातचं राहतात त्यांचं भरन पोषण तिथंच होत पण निसर्गाने निर्माण केलेला निर्मळ चिखल, शहरी माणसाला टिकवता येत नाही आणि माणसाला स्वतःचीच घाण वाटू लागते.निसर्गाचे मोठेपण आणि माणसाचे कोतेपण या घटनेने अधोरेखित झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.