बेळगाव लाईव्ह;घरगुती भांडणानंतर विषारी कीटकनाशक प्राशन केल्याने अत्यवस्था अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या निंग्यानट्टी (ता. जि. बेळगाव) येथील एका विद्यार्थिनीचा उपचाराचा फायदा न होता मृत्यू झाला आहे.
मयत दुर्दैवी मुलीचे नांव संजना बसवाणी तडशीनहाळ (वय 17, रा. निंग्यानट्टी) असे आहे. गोठ्यातील गाईचे शेण काढण्यावरून गेल्या सोमवारी 20 एप्रिल रोजी झालेल्या भांडणानंतर या विद्यार्थिनीने विषारी कीटकनाशक प्राशन केले होते.
त्यानंतर तिला अत्यवस्थ अवस्थेत ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तथापि दुर्दैवाने उपचाराचा फायदा न होता काल मंगळवारी तिचा मृत्यू झाला.
काकती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर घटनेची काकती पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.





