belgaum

१२ तास रंगली बेळगावची ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक;

0
257
 belgaum

बेळगाव लाईव्ह :
ढोल-ताशांच्या गजरात, शिवरायांच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास उलगडणाऱ्या देखाव्यांसह आणि छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषात बेळगाव शहरातील ऐतिहासिक श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणूक तब्बल १२ तास रंगली. मंगळवारी सायंकाळी सुरू झालेला हा भव्य सोहळा बुधवारी सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात शांततेत पार पडला.

नरगुंदकर भावे चौक येथे मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या पालखी पूजनाने मिरवणुकीची सुरुवात झाली. यावेळी खासदार जगदीश शेट्टर, महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाली, पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह अनेक मान्यवर आणि हजारो शिवभक्त उपस्थित होते.

मिरवणुकीत पारंपारिक ढोल-ताशा, लाठी-बोथाटी आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके यामुळे वातावरण दणाणून गेले होते. यंदा डीजेला फाटा देत मंडळांनी शिवजन्मापासून राज्याभिषेकापर्यंत आणि संभाजी महाराजांच्या बलिदानापर्यंतचे जिवंत देखावे सादर केले. कांगली गल्लीच्या एकता युवक मंडळाचा ‘अफजलखानाचा वध’ हा देखावा विशेष आकर्षण ठरला.

 belgaum

रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या मिरवणुकीत धर्मवीर संभाजी चौकातील प्रेक्षक गॅलरी खचाखच भरली होती. पहाटेपर्यंतही शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. अखेरीस बुधवारी सकाळी साडेसात वाजता आनंदवाडी मंडळाच्या देखाव्याने मिरवणुकीची सांगता झाली.

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत मिरवणूक शांततेत पार पाडली, तर स्वयंसेवी संस्थांनी शिवभक्तांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.