बेळगाव पोलीस आयुक्तालय व्याप्तीतील विविध गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लावून बेळगाव शहर पोलिसांनी जप्त केलेला 1 कोटी 51 लाख रुपयांचा मुद्देमाल 'प्रॉपर्टी परेड'द्वारे आज गुरुवारी संबंधित 55 मालकांकडे सुखरूप परत करण्यात आला. या मुद्देमालामध्ये रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने, 3 कारगाड्या...
गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडलेले असताना आता ग्रामीण भागातील सरकारी स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानातून ग्रामीण लोकांच्या सोयीसाठी उपलब्ध होणारे रॉकेलही गेल्या दोन महिन्यापासून बंद झाल्यामुळे गावकऱ्यांची विशेष करून महिलावर्गाची मोठी गैरसोय होत आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामीण भागातील...
माजी महापौर शिवाजी सुंठकर यांची घरवापसी होऊन ते पुन्हा समितीमध्ये परतले असून त्यामुळे बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटामध्ये आज यशस्वी एकी झाली. परिणामी महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला असणाऱ्या बेळगाव तालुक्यातील समस्त कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांमध्ये पुनश्च एकवार...
मी समितीचा होतो,समिती माझ्या रक्तात भिनलेली आहे.प्रत्येक ग्रामपंचायतीवर समितीचा भगवा फडकला पाहिजे यासाठी मी दुसऱ्या गोटात असलो तरी प्रयत्न केलेले आहेत.
समितीच्या प्रत्येक विजयासाठी शिवाजी सुंठकर आता झोकून काम करणार आहे, अनेकांनी मला एकी करण्यासाठी सुचवले होते ती एकी आज...
धोबीपछाड मारून बेळगावचा महापौर झालेला 'शिवाजी' आजच्या भाषणात मला परत दिसला, असे उस्फुर्त उद्गार महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी काढले.
तालुका समितीच्या दोन्ही गटामध्ये एकी करण्यासंदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक आज दुपारी पार पडली. या...
मराठी माणसांचा मराठी आत्मा हा कर्नाटकी पिंजऱ्यात अडकला आहे 65 वर्षे चाललेल्या या लढ्यात मराठी माणूस निष्ठेने झगडत आहे. कालपरत्वे बिनीच्या सरदारांमध्ये काही मनं दुखावली होती,परंतु सगळ्यांचा उद्देश्य हा मराठीचा उत्कर्ष हाच असल्याने व सीमा प्रश्न हे ध्येय असल्याने...
कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडीबिल्डर्स संघटनेच्या मान्यतेने सतीश जारकीहोळी फाउंडेशन प्रस्तुत 'वज्रदेही -2021' ही भव्य बक्षीस रकमेची राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा येत्या रविवार दि. 19 डिसेंबर 2021 रोजी नंजनगुड येथे आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरील 'मि....
विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने आणि बार येत्या बुधवार दि. 8 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजल्यापासून शुक्रवार दि. 10 डिसेंबर 2021 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
त्याचप्रमाणे मतमोजणी दिवशी मंगळवार दि. 14 डिसेंबर...
बेळगावातील केवळ किन्नरांकडून चालविल्या जाणार्या पहिल्या फुड कार्ट अर्थात अन्नपदार्थांच्या गाडीचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
शहरातील गृहिनींकडून चालविल्या जाणाऱ्या इनरव्हील क्लबतर्फे ही किन्नरांची खाद्यपदार्थांची गाडी पुरस्कृत करण्यात आली आहे. किन्नर समाजाच्या सक्षमीकरणासाठी क्लबने ही 45 हजार रुपये किंमतीची...
हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर रिंग रोड बाबत हालचाली सुरू असतानाच आता लवकरच पिरनवाडी नाका ते व्हीटीयुपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. तथापि याला पिरनवाडीवासियांनी कडाडून विरोध केला आहे.
पिरनवाडी नाका ते व्हीटीयुपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असल्याची...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...