Wednesday, April 24, 2024

/

निवडणुकीनिमित्त ‘ड्राय डे’चा आदेश जारी

 belgaum

विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने आणि बार येत्या बुधवार दि. 8 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजल्यापासून शुक्रवार दि. 10 डिसेंबर 2021 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.

त्याचप्रमाणे मतमोजणी दिवशी मंगळवार दि. 14 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने व बार बंद राहणार आहेत.

यासंदर्भातील आदेश जिल्हा निवडणूक निर्वाचन अधिकारी व जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी जारी केला आहे. विधान परिषद निवडणुक प्रक्रिया पारदर्शी होण्याबरोबरच मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी.

 belgaum

यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने आणि बार उपरोक्त कालावधीत बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

संबंधित कालावधीत दारूचा साठा करणे, चोरट्या मार्गाने दारू विक्री करणे आदी गोष्टी गुन्ह्यास पात्र ठरणार असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा आदेशाद्वारे देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.