belgaum

बेळगाव मनपात नगर रचना व विकास स्थायी समितीची बैठक पार

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेच्या नगर रचना व विकास स्थायी समितीची बैठक मंगळवारी पार पडली. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रेयस नाकाडी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत महापालिकेच्या विविध प्रभागांतील विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात येऊन अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

घातक मानल्या जाणाऱ्या मांजाचा पुरवठा व विक्रीवर पूर्णपणे बंदी घालणे आणि मांजामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी पोलीस विभागाच्या सहकार्याने कडक पावले उचलण्याच्या सूचना सदस्यांनी दिल्या.

विशेषतः महापालिकेच्या मालमत्ता आणि पदपथांवरील अतिक्रमणांबाबत कडक नियमांची अंमलबजावणी करणे तसेच अतिक्रमण हटवल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

 belgaum

या बैठकीस महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी , सामाजिक न्याय स्थायी समिती अध्यक्ष राजू भातकांडे, सत्ताधारी पक्षनेते संतोष पेडणेकर, समिती सदस्य गिरीश धोंगडी, जयंत जाधव, सविता पाटील, अभिजित जवळकर, लक्ष्मी लोकरी, खुर्शीद मुल्ला, तसेच महापालिकेचे विकास शाखा उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर, प्रशासन शाखा उपायुक्त उदय कुमार बी. टी., मुख्य लेखाधिकारी मंजुनाथ बिडीकर, अभियंता हनुमंत कलादगी, अनूप व इतर अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.