19.7 C
Belgaum
Saturday, December 2, 2023
 belgaum

Daily Archives: Nov 2, 2021

दिवाळीनिमित्त ‘या’ मंडळाने राबविला ‘हा’ उपक्रम

दिवाळीचा आनंद सर्वांना मिळावा या उद्देशाने बबन भोबे मित्र मंडळातर्फे शहरातील विविध संस्थांना तेल, साबण आदी साहित्यासह दिवाळीच्या फराळचे वाटप करण्यात आले. समादेवी गल्ली येथील हनुमान टेलिफोन बूथ याठिकाणी आज सकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बबन भोबे मित्र...

आरएफओंच्या विरोधात जीवे मारण्याच्या धमकीची तक्रार

लोंढा (ता. खानापूर, जि. बेळगाव) वनविभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर अर्थात वनक्षेत्रपाल प्रशांत गौराणी यांनी कपाळाला पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार भाजप नेते व माजी जि. पं. सदस्य बाबूराव देसाई यांनी खानापूर पोलिसांना दिली आहे. खानापूर भाजपकडून...

नोटीस जारी होताच बसविण्यात आले हजारो कॅमेरे

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अपार्टमेंट, व्यवसायिक आस्थापणे, हॉटेल्स, धाबे तसेच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या 2 हजार जणांना पोलिस खात्याच्यावतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिस जारी करताच तब्बल 26 हजार कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बेळगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी...

नीट परीक्षेत ‘हिने’ केले बेळगावचे नांव उज्वल!

शहरातील खानापूर रोड, टिळकवाडी येथील आकाश इन्स्टिट्यूट या संस्थेच्या रोशनी तीर्थळ्ळी हिने प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेमध्ये (नीट युजी -2021) देशात 103 वा क्रमांक मिळविताना स्वतःसह आपले आई-वडील आणि संस्थेचे नांव उज्ज्वल केले आहे. नीट यूजी -2021 परीक्षेचा निकाल आज मंगळवारी...

नवा समाज निर्मितीसाठी माझे प्रयत्न : आम. जारकीहोळी

धर्माच्या विरोधात बोललो म्हणून माझ्यावर भरपूर टीका झाली असली तरी मी माझा मार्ग सोडलेला नाही. नवनव्या लोकांना सोबत घेऊन नवा समाज निर्माण करण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच आहेत, असे केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. चिक्कोडी येथे सोमवारी सायंकाळी मानव...

सिंदगी येथे भाजपची बाजी, हनगल मध्ये काँग्रेस

सिंदगी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार रमेश भुसनूर विजयी झाले आहेत. ते 31185 मतांच्या फरकाने विजयी झाले. भाजपचे उमेदवार रमेश भुसनुर यांनी काँग्रेसचे अशोक यांच्यावर विजय मिळवला अशोक यांना ६२६८० तर रमेश भुसन यांना ९३,८६५ मते मिळाली. जेडीएस च्या नाझिया अंगडीला ४३५३...

‘आरएलएस’चा मोहम्मद कैफ देशात 384 वा

केएलई संस्थेच्या राजा लखनगौडा विज्ञान (आर.एल.एस.) महाविद्यालयाच्या मोहम्मद कैफ या विद्यार्थ्याने नीट परीक्षेमध्ये देशात 384 वा क्रमांक पटकाविला आहे. एवढेच नाही तर या महाविद्यालयाच्या तब्बल 20 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा उत्तीर्ण होऊन अभिमानास्पद कामगिरी केली आहे. राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात...

तरुणी घरातून बेपत्ता होण्याच्या प्रकारात वाढ

सध्या तरुणींकडून प्रेम प्रकरणासह अन्य कारणास्तव घर सोडून पळून जाण्याचे प्रकार वाढले असून गेल्या महिन्याभरात शहर परिसरातून 5 युवती घरातून बेपत्ता झाल्यामुळे त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. तरुणी घरातून पळून जाण्यात प्रकरणी पोलिसात केवळ मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल...

… म्हणे कुत्रे भुंकल्याने कांही होत नाही

'हत्ती डौलाने जात असताना कुत्रे भुंकल्याने कांही होत नाही' असे वादग्रस्त वक्तव्य करून जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या सीमा लढ्याची खालच्या पातळीवर जाऊन तुलना केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. शहरातील सीपीएड मैदानावर...

दफन केलेला मृतदेह काढला बाहेर

खानापूर येथे आंतरधर्मीय प्रेमप्रकरणातून सुपारी देऊन खून झालेल्या अरबाज आफताब मुल्ला या तरुणाच्या मृतदेहांची डीएनए चांचणी केली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयाच्या परवानगीने कबरीतून मृतदेह बाहेर काढून केस व इतर नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. मयत अरबाज आफताब मुल्ला (वय...
- Advertisement -

Latest News

अधिवेशन विरोधी समितीचा लढा कसा असणार? बैठकीचे आयोजन

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधी मंडळ अधिवेशनविरोधी महाराष्ट्र एकीकरण लढ्याची रूपरेषा शनिवारी ठरण्याची शक्यता आहे. मध्यवर्ती समितीच्या 11 जणांची बैठक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !