20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Nov 22, 2021

आंदोलन करणार तर घ्या पूर्वपरवानगी

कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्याच्या 13 ते 24 तारखे दरम्यान होणार आहेत. अधिवेशन काळात कोणत्याही प्रकारचे आंदोलन करावयाचे असल्यास पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. विधानसभेच्या अधिवेशन काळात आंदोलन करणारे, निवेदन देणाऱ्यांना सर्वप्रथम पोलीस आयुक्त कार्यालयात हजर राहून पूर्वकल्पना द्यावी...

नगरसेवकांना मतांचा अधिकार;शक्यता चिकोडीत मतमोजणीची

विधानपरिषद निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर बेळगावचे जिल्हा प्रशासनही पूर्वतयारीत गुंतले आहे. या पार्श्वभूमीवर प्रभारी जिल्हाधिकारी वेंकटेश कुमार यांनी पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींची भेट घेतली. मिट टू प्रेस मध्ये बोलताना यावेळी निवडणुकीसंदर्भातील बरीच महत्त्वाची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे. विधानपरिषद निवडणुकीत...

आदेश डावलून सुरू झालेले काम पाडले बंद!

उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना देखील हलगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम हाती घेण्याचा कंत्राटदाराचा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पाडून काम बंद केल्याची घटना आज सकाळी अनगोळ शिवारात घडली. बेळगावच्या चौथ्या दिवाणी न्यायालयाने हलगा -मच्छे बायपासला स्थगिती दिली असून त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग...

अथणी हेस्कॉम कार्यालयातील भ्रष्टाचाराची चौकशी सुरूच

अथणी येथील हेस्कॉम कार्यालयातील मोठ्या भ्रष्टाचाराची चौकशी व तपास गेले दोन महिने सुरूच असून या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणण्यासाठी जवळपास 60 अधिकारी दिवसरात्र झटत आहेत. या अधिकाऱ्यांनी अद्याप आपला तपशीलवार अहवाल सादर केलेला नाही. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हुबळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय...

राज्य निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक चुकीच्या पद्धतीने झाली आहे अशी तक्रार गेल्या 18 सप्टेंबर रोजी प्रभाग क्र. 50 च्या उमेदवार गीता मनोहर हलगेकर यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्या तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले...

काँग्रेसच्या पराभवासाठी भाजपाने कसली कंबर

येत्या 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले असून भाजप व काँग्रेसने आपल्या उमेदवारांची नांवे जाहीर केली आहेत. भाजपने पूर्वीच्याच महांतेश कवटगीमठ यांना उमेदवारी देऊन एक प्रकारे मतदारांमधील उत्सुकता कमी केली आहे, तर काँग्रेसने विद्यमान...

बेळगावच्या शास्त्रज्ञाचे निधन

सुळगा -हिंडलगा बेळगाव येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. अरुण जायण्णावर यांचे आज पहाटे 2:30 वा. सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले. निधन समयी त्यांचे वय 65 वर्षे होते त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. शहापूर स्मशान...

लोकसभेत आवाज उठविणार- धैर्यशील माने यांचे युवा समितीला आश्वासन

बेळगाव येथील भाषिक अल्पसंख्याक खात्याचे कार्यालय चेन्नई येथे स्थलांतर करण्यात आले आहे. याबाबत आवाज उठवून पुन्हा कार्यालय बेळगाव येथे आणण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे खासदार धैर्यशील माने यांच्याकडे करण्यात आली आहे. युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर...

ही” अन्यायी पार्किंग भाडे आकारणी मागे घेण्याची मागणी

बेळगाव शहरातील क्लब रोडवर बेळगाव महापालिकेकडून कार पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मात्र पार्किंगसाठीची भाडे आकारणी अन्यायकारक असल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून ही भाडे आकारणी मागे घ्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. बेळगाव महापालिकेकडून शहरातील क्लब रोडवर सिव्हिल...

विधान परिषद निवडणूक; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल रविवारी मतदान केंद्र निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. विधान परिषद निवडणुकीची कच्ची मतदार यादी गेल्या 11 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !