ऐन दिवाळीमध्ये हलशी भागातील विविध गावांमधील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी बीडी येथील हेस्कॉमच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला तसेच यापुढेही अशीच परिस्थिती राहिल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
गेल्या काही महिन्यांपासून हलशी, नंदगड, हलगा, मेरडा आदी भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित होणे नित्याचे बनले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून एखाद्या गावामधील वीज पुरवठा खंडित होताच लोकांनी हेस्कॉम कार्यालय किंवा लाइनमनशी संपर्क साधला असता बिडी येथील सब स्टेशनमधून वीज पुरवठा खंडित केला जातो.
अशी माहिती दिले जाते. मात्र वीज पुरवठा खंडित होण्याचे कारण वेगळेच असते त्यामुळेच युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी बिडी येथील कार्यालयात जाऊन जाब विचारला यावेळी येथील कर्मचाऱ्यांनी हलशी किंवा इतर भागात समस्या निर्माण झाल्यानंतर वीज पुरवठा बंद करण्याची सूचना केली जाते त्यामुळे आपण वीज पुरवठा बंद करतो अशी माहिती दिली. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे कारण वेगळेच असल्याचे दिसून आले. त्यामुळे येणाऱ्या काळात अशाच प्रकारे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू राहिल्यास हलशी आणि इतर भागातील हेस्कॉमच्या सेक्शन अधिकाऱ्यांना भेटून जाब विचारण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
रघुनाथ देसाई, पांडुरंग देसाई, वामन देसाई, साईश सुतार, विशाल देसाई, प्रशांत देसाई, गजानन देसाई, वैभव देसाई, मारुती देसाई, नागो देसाई आदी यावेळी उपस्थित होते
युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याबाबत हेस्कॉमच्या सहायक कार्यकारी अभियंत्या कल्पना तिरवीर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. यावेळी तिरविर यांनी अनेकदा वृक्ष किंवा फांदी कोसळल्यामुळे समस्या निर्माण होते. अशी माहिती देत येणाऱ्या काळात आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन दिले.
बेळगाव शहरात देखील अनेकदा बत्ती गुल होण्याचे प्रकार वाढत असून ऐन दिवाळीत असे होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.