ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने युवक घटनास्थळी जागीच ठार झाल्याची घटना हलग्या जवळ पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे.
आकाश यल्लप्पा पाटील वय 22 रा. बस्तवाड हलगा असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.गुरुवारी सायंकाळी सव्वा सात वाजता हा अपघात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश हा दुचाकी वरून हायवे वरून बस्तवाड कडे जात असतेवेळी हलगा ब्रिजवर पाठीमागून ट्रकने जोराची धडक दिली त्यात आकाशच्या डोक्याला जबर मार बसला त्यात घटनास्थळी मृत्यू झाला.
हिरेबागेवाडी पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. मयत आकाश हा कार चालक होता खाजगी कारचा ड्रायव्हर म्हणून काम करत होता.