केंद्र सरकारने संम्मत केलेले कृषी विधेयक आणि त्यावरून शेतकऱ्यांचे सुरु असलेले आंदोलन याच्याशी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही, असे वक्तव्य केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केले आहे. आज गोकाक येथे गृहकचेरीत झालेल्या एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
यमकानमर्डी मतदारसंघातील दिव्यांग लाभार्थींना केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी तीनचाकी वाहने वितरित केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. कृषी मंत्री बी. सी. पाटील हे एका जबाबदार पदावर आहेत .
त्यांनी कोणतेही वक्तव्य तितक्याच जबाबदारीने केले पाहिजे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख त्यांनी समजून घेतले पाहिजे. कृषी विधेयकाविरोधात सुरु असलेले आंदोलन हे शेतकऱ्यांनी स्वतःच्या निर्धारावर सुरु केले आहे.
या आंदोलनाशी काँग्रेस पक्षाचा कोणताच संबंध नाही. शेतकऱ्यांनी निर्धार केल्याप्रमाणे हे आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने हा कायदा मागे घ्यावा यासाठी शेतकरी आंदोलन करून स्वतःचा झेंडा रोवू पाहात आहेत, असे वक्तव्य सतीश जारकीहोळी यांनी केले.