केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी १३ महामार्ग प्रकल्पांची घोषणा केली. यामध्ये बेळगावच्या रिंगरोडची देखील घोषणा करण्यात आली असून सुमारे २८०० कोटी रुपयांच्या खर्चातून ६९ किलोमीटरच्या रिंगरोडचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सुमारे २१००० कोटींच्या खर्चातून एकूण ८४७ किलोमीटरच्या महामार्गाची घोषणा केवळ उत्तर कर्नाटकासाठी करण्यात आली आहे.
हुबळी मधील राणी चन्नम्मा सर्कल येथील एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि कलघटगी तालुक्यातील दास्तीकोप्प येथील बेडथी जवळील पुल बांधकामाच्या च्या पायाभरणी कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली.
बेळगाव जिल्ह्यासाठी एकूण १५९९५ रुपये कोटींचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी ६९ किलोमीटरच्या रिंगरोडचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून यासाठी २८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
३२५ किलोमीटरचा बेळगाव – हुनगुंद – रायचूर हा चारपदरी महामार्ग १२५०० कोटींच्या खर्चातून, निपाणी – चिकोडी महामार्ग रुंदीकरण (एनएच ६०) १४५ कोटींच्या खर्चातून, संकेश्वर – मुरगुंडी (एनएच५४८) हा ८९ किलोमीटरचा महामार्ग ५५० कोटी रुपयांच्या खर्चातून करण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.