गुलबर्गा येथे गुलबर्गा सोलापूर आणि निपाणी जवळ महाराष्ट्र बस थांबवून कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाल पिवळा कन्नड ध्वज हातात घेवून घोषणाबाजी केली. काचेवर काळी शाई लावली.
कर्नाटकच्या बसवर पुणे येथे बेळगाव,कारवार,निपाणी संयुक्त महाराष्ट्र होणार असे पोस्टर लावल्यावर कन्नड रक्षण वेदिकेने महाराष्ट्राच्या बसवर चढून लाल पिवळा कन्नड ध्वज हातात घेवून आंदोलन छेडले.
गुलबर्गा येथे हा प्रकार घडला आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सीमाभाग महाराष्ट्रात घेणारच असे जाहीर केल्या नंतर कन्नड संघटना अस्वस्थ झाल्या आहेत.पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बेळगाव,निपाणी ,कारवार संयुक्त महाराष्ट्र होणारच असे पोस्टर पुणे येथे कर्नाटक बसवर लावल्यावर त्याचे पडसाद कर्नाटकात उमटले आहेत.
गुलबर्गा येथे गुलबर्गा सोलापूर बस थांबवून कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले.निपाणी जवळ देखील लाल लाल परी वर कन्नड पोस्टर लावले आहे.