लॉक डाऊन आणि कोरोनामुळे विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे त्यामुळे जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात दहावी आणि बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पी यु सी द्वितीय तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एस एस एल सी परीक्षा घेण्यात येतील अशी माहिती शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी दिली आहे.
दहावी बारावी परिक्षे बाबत शिक्षण खात्या कडून शाळाना परीक्षा नियमावली,अंतिम अभ्यासक्रम आदी माहिती पाठवण्यात आली आहे.ते म्हणाले विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या किमान धड्यांची संख्या ओझी समजली जाईल.
पहिली ते नववी अभ्यासक्रमात कपात नाही
पहिली ते नववीसाठीच्या संदर्भात पर्यायी शैक्षणिक वेळापत्रक निश्चित केले गेले आहे. या वर्गांसाठी पाठ्यपुस्तकांचा प्रस्ताव विभागाकडे नाही.
मूल्यांकन प्रक्रिया शाळा स्तरावर चालविली गेली आहे आणि मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेच्या आधारे एक साधी मूल्यांकन प्रक्रिया राबविली जाईल.