Monday, November 25, 2024

/

सरकारच्या कार्याचे डॉ. सोनाली सरनोबत यांनी केले कौतुक

 belgaum

गोहत्या बंदी कायदा अंमलात आणण्यासाठी गेली कित्येक वर्षे मागणी करण्यात येत होती. या मागणीचा विचार करून कर्नाटक सरकारने गोहत्या विधेयक मांडून ते पास केले आणि कोट्यवधी गोरक्षकांचे स्वप्न पूर्ण झाले. सरकारने उचललेले हे पाऊल नवा इतिहास घडविणारे ठरले असून सरकारच्या निर्णयाचे कौतुक असल्याचे वक्तव्य पशु कल्याण मंडळाच्या सदस्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी केले.

यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले असून सरकारच्या निर्णयाचे अभिनंदन केले आहे. सरकारने राज्यात गोहत्या बंदी कायदा अंमलात आणून असंख्य गोरक्षकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाचे आपण स्वागत करीत असून सरकारने घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद असल्याचे सोनाली सरनोबत यांनी या पत्रकात नमूद केले आहे.

गोहत्या बंदी कायदा जारी करण्यात आली, यावेळी आपण पशु कल्याण मंडळाच्या सदस्या म्हणून कार्यरत असल्याने हि आमची पुण्याई असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. गोहत्या निषेध जारी करण्यात आल्यानंतर पशु कल्याण मंडळाच्या सदस्या या नात्याने राज्यात या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण काळजी घेऊ असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

कर्नाटकात आता गो हत्या निषेध कायदा जारी करण्यात आला असून या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येईल.राज्यात विविध जिल्ह्यात अचानक भेटी देऊन कायद्याचे उल्लंघन होत आहे का याची पडताळणी करण्याची जबाबदारी आपण अत्यंत प्रामाणिकपणे घेण्याचा संकल्प या प्रसिद्धीपत्रकात डॉ. सोनाली सरनोबत यांनी नमूद केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.