बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी असताना देखील प्रवेश करून भगवा ध्वज फडकावल्या प्रकरणी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे,संजय पोवार यांच्यासह एकूण आठ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
21 जानेवारी रोजी शिनोळी सीमेवर कोल्हापूर जिल्ह्यातील शिव सैनिकांनी आंदोलन करत सीमाभागात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता बेळगाव मनपा वर भगवा ध्वज फडकवण्यासाठी ते कोनेवाडी या गावात दाखल झाले होते ध्वज फडकावत घोषणाबाजी केली होती.
बेळगाव पोलिसांनी देवणे आणि पोवार यांच्यावर बंदी घातली असताना प्रवेश केल्याचा ठपका ठेवत काकती पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.
बेळगाव पोलिसांनी अनेकदा महाराष्ट्रातील नेत्यांवर असे गुन्हे वेळोवेळी दाखल केले आहेत 1986 च्या कन्नड सक्ती आंदोलनात छगन भुजबळ,याशिवाय राष्ट्रवादी दिवंगत नेते आर आर पाटील यांच्यासह अनेकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
बेळगाव सहसीमा भागात शांतता भंग करून दोन भाषिकात तेढ निर्माण केल्याचा ठपका या शिव सैनिकांवर ठेवण्यात आला आहे.
शनिवार आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे त्याच दिवशी शिवसैनिकांवर बेळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.