दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव थिएटर असोसिएशन तर्फे नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा महोत्सव ३१ जानेवारी २०२१ रोजी कोनवाळ गल्ली बेळगांव येथील “लोकमान्य रंगमंदिर” येथे सादर होत आहे.
या अंतर्गत “क्रुसेडर्स थिएटर”,बेळगांव एकन्नाव पार्टी ” या बेळगाव मधील संघांतर्फे एकूण ४ एकांकिकांचे सादरीकरण होणार असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे
एकांकिका – “तुझं माझं जमेना”
लेखक – मोतीराम रांगणेकर, दिग्दर्शक – प्रभंजन भातकांडे
एकांकिका – “धांडोळा”
लेखक – रवींद्र वाडकर , दिग्दर्शक – अपेक्षा बिर्जे
एकांकिका – “मादी”
लेखक – विजय तेंडुलकर दिग्दर्शक – सुजित बिर्जे
एकांकिका – “व्हॅलेंटाईन डे”
लेखक – ह्रिषीकेश तुराई दिग्दर्शक – सुजित बिर्जे
नाटकाचा उत्तम प्रगल्भ वारसा लाभलेल्या बेळगावमध्ये, बेळगावची आजची तरुण पिढी त्याच जोमाने तो वारसा जतन करण्याचा, नाट्य परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी बेळगावच्या रसिक प्रेक्षकांनी महोत्सवाला उपस्थित राहून एकांकिकांचा आस्वाद घ्यावा आणि कलाकारांचे मनोबल वाढवावे. असे आवाहन ” बेळगाव थिएटर असोसिएशन” तर्फे करण्यात आले आहे.
प्रवेशिका महोत्सवा दिवशी लोकमान्य रंगमंदिरात उपलब्ध असतील. दुपारी ४.३० वाजता महोत्सवास सुरुवात होईल.असे कळविण्यात आले आहे.