महाराष्ट्र शासनाच्या सीमा कक्षाच्यावतीने शासनाचे सीमाप्रश्नाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्या “महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प” या पुस्तकाचे प्रकाशन बुधवार दि. 27 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, राज्यमंत्री सतेज पाटील, दत्तात्रय भरणे, खासदार अरविंद सावंत, मंगलप्रभात लोढा आदिंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे. महाराष्ट्र शासनाचे सीमाप्रश्नाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण – www.parthlive.com. या साईटवर क्लिक करून मोबईल,टॅब, लॅपटॉप, डेस्कटॉप कॉम्प्युटरवर कार्यक्रम पाहता येईल. याशिवाय सोशल मीडिया (1) https://twitter.com/CMOMaharashtra (2) https://www.facebook.com/CMOMaharashtra/
(3) https://youtube.com/channel/UCjCKXS5a7qk446ro9ExD4hQ (4) www.twitter.com/MahaDGIPR (5) www.facebook.com/MahaDGIPR (6) www.youtube.com/maharashtradgipr
या प्लॅटफॅार्मवरही थेट प्रक्षेपण होईल,असे डॉ.दीपक पवार, विशेष कार्य अधिकारी ,महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न यांनी कळविले आहे.