नैराश्याच्या भरात युवकाची रेल्वेखाली आत्महत्या
नैराश्याच्या भरात एका युवकाने स्वतःला रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना अनगोळ चौथ्या रेल्वे गेटनजीक घडली.
शरद रामचंद्र काटे (वय 27, रा. कणबर्गी) असे आत्महत्या करणाऱ्या दुर्दैवी युवकाचे नांव आहे. शरद त्याने काल गुरुवारी निराशेच्या भरात रेल्वेखाली स्वतःचे जीवन संपविण्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
सदर घटनेची बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.