रुग्णांचे हाल दवाखाने मालामाल कोरोना महामारी सर्वत्र फैलाव होत आहे. या परिस्थितीत कोणत्याही दवाखान्यात रुग्णांना दाखल करून घेणे धोकादायक ठरत असल्याचे सांगून वेळ मारून नेण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. दरम्यान काही हॉस्पिटल रुग्णांकडून पैसे उकळण्याचे कामे करत असल्याचे आरोप होत आहेत.
सध्या खानापूर तालुक्यातील कुपुटगिरी येथील एका रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी अनेक दवाखान्यातील डॉक्टरांनी हलगर्जीपणा दाखवला आहे. संबंधित रुग्णाला अर्धांगवायूचा त्रास असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी हेळसांड झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना अनेक रुग्णांच्या बाबतीत घडत आहेत. मात्र याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.
एखादा रुग्ण त्याला जेमतेम आजार असल्यास दवाखान्यात गेल्यानंतर पहिला सिविल हॉस्पिटल मधील कोरोना निगेटिव्ह अहवाल आणा त्यानंतर तुम्ही दाखवा असे सांगण्यात येत आहे. मात्र याचा सर्वस्वी फटका रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान खानापूर तालुक्यातील एका रुग्णाबाबातही अशीच घटना घडली आहे. मात्र याचा सर्वस्वी फटका रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे.
अजूनही त्या रुग्णाची अवस्था काय आहे हे सांगता येत नाही. मात्र याकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. काही खाजगी हॉस्पिटलला कोरोना केअर सेंटर बनविण्यात आले असले तरी काही खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील रुग्णांना दाखल करून घेण्यास परवानगी देण्यात येत नाही. त्यामुळे सध्या भितीदायक वातावरण निर्माण झाले असून यापुढे तरी खाजगी हॉस्पिटलने इतर रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घ्यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कुपुटगिरी खानापूर येथील नागप्पा कल्लाप्पा पाटील यांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र प्रत्येक दवाखान्यात नको हाच शब्द त्यांना ऐकावयास मिळत होता. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला.