Saturday, December 21, 2024

/

जिल्ह्यात 112 तर राज्यात 19,035 अॅक्टिव्ह केसेस : 500 वर गेला मृतांचा आकडा

 belgaum

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव शहरासह जिल्ह्यात आणखी 15 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 465 झाली आहे. बेळगावसह राज्यात नव्याने एकूण 2,313 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 10 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 33,418 इतकी झाली आहे.

बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात आणखी 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 465 इतकी वाढली आहे. नव्याने आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये खासबाग बेळगाव येथील 1 वर्षीय बालिकेसह सात पुरुष आणि आठ महिलांचा समावेश आहे. शहरातील एक 55 वर्षीय पुरुष, हिंदवाडी येथील 60 वर्षीय पुरुष आणि सदाशिनगर येथील 23 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील यळेबैल, बसवन कुडची, मल्लापूर, हुक्केरी, अडी -चिकोडी, सौंदलगा, जैनवाडी- चिकोडी, अथणी, ऐनापूर -अथणी आणि भोजवाडा -रामदुर्ग याठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने जाहीर केलेल्या वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 10 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगाव जिल्ह्यात एकूण 29,617 संशयित व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 5,530 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 112 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 9,107 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 14,868 आहे.

कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 28,321 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 465 नमुन्यांचा वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून मृतांची संख्या 9 इतकी वाढली आहे. जिल्ह्याबाहेरील (बागलकोट) पॉझिटिव्ह रुग्ण 08 आहेत. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 26,469 नमुने निगेटिव्ह असून ॲक्टिव्ह केसीस 112 आहेत. त्याचप्रमाणे 808 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 346 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवार दि. 9 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शुक्रवार दि. 10 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 2,313 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 33,418 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 19,035 असून यापैकी 472 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात शुक्रवारी 1003 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 13,836 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 57 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 543 झाली असून यापैकी चौघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात चित्रदुर्ग वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी पहिल्या तीन क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 1,447 रुग्ण – एकूण रुग्ण 15,329), मंगळूर (139-1840), विजयपुरा (89-710) आणि बेळगाव (15-465).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.