कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहरातील सराफी व्यापाऱ्यांनी शनिवार दि. 25 जुलै 2020 पासून दररोज संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंतच आपली दुकाने व व्यवहार चालू ठेवावेत, असे आवाहन बेळगांव सराफी व्यापारी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
बेळगांव सराफी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांची बैठक आज शुक्रवारी पार पडली. या बैठकीवेळी सध्याची विपरीत परिस्थिती आणि बेळगांव शहर परिसरातील कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व्यापारी बंधूंच्या हिताच्या दृष्टीने उद्या शनिवार दि. 25 जुलै 2020 पासून दररोज संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंतच शहरातील सराफी व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने व व्यवहार सुरू ठेवावेत, असा ठराव एकमताने संमत करण्यात आला.
तरी सर्व व्यापारी बंधूंनी सहकार्य करावे, असे आवाहन बैठकीत आले. त्याचप्रमाणे जर कोणी सायंकाळी 5 नंतर दुकाने किंवा व्यवहार सुरु ठेवल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील बेळगांव सराफ व्यापारी संघटनेने दिला आहे.