Sunday, December 1, 2024

/

भिंतीवरील “तो” मजकूर पुसून “यांनी” व्यक्त केला शिवरायांबद्दलचा आदर

 belgaum

न्यू गुड्स शेड रोड शास्त्रीनगर परिसरातील अस्वच्छ सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर लिहिण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नांवाचा मजकूर युवा सेना बेळगावच्या कार्यकर्त्यांनी पुसून टाकून शिवरायांबाबतचा आपला आदर व्यक्त केला.

न्यू गुड्स शेड रोड शास्त्रीनगर परिसरातील अस्वच्छ सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नांवाचा “राजे छत्रपती आणि एक मराठा लाख मराठा” असा मजकूर लिहिण्यात यात आला असल्याचे व्हाट्सअपच्या माध्यमातून युवासेना बेळगावच्या निदर्शनास आले.

Wall matter deleted
Wall matter deleted

त्यांनी लागलीच सामाजिक कार्यकर्ते गौरांग गेंजी यांच्याशी संपर्क साधला. तेंव्हा गेंजी यांनी अस्वच्छ ठिकाणी लिहिण्यात आलेला छत्रपतींच्या संदर्भातील तो मजकूर आपण पुसून टाकू असे मत व्यक्त केले. त्यानुसार गौरांग गेंजी यांच्यासह युवासेना बेळगावच्या कार्यकर्त्यांनी न्यू गुड्स शेड रोड येथे जाऊन गवतझुडपे वाढलेल्या अस्वच्छ ठिकाणी असलेला संबंधित मजकूर पुसून ती भिंत रंगविली.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ जागेत भिंतीवर देव-देवतांची अथवा युगपुरुषांची नांवे लिहिलेली पहावयास मिळत असतात. तेंव्हा बेळगाव शहरात असा प्रकार आढळल्यास हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी देव-देवतांची अथवा शिवरायांसारख्या युगपुरुषांची भिंतीवर लिहिलेली ती नांवे तात्काळ पुसावीत अथवा त्यावर रंग लावून संबंधितांबद्दलचा आपला आदर व श्रद्धा व्यक्त करावी, असे आवाहन गौरांग गेंजी यांनी केले आहे.

बेळगावातील युवकांनी असा दाखवला शिवरायांच्या प्रति आदर-#yuvasenabgm#belgaumshivajimaharaj

Posted by Belgaum Live on Sunday, July 26, 2020

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.