तिसऱ्या टप्प्यातील लॉक डाऊन रविवारी मध्यरात्री संपणार असून चौथ्या टप्प्यातील कर्नाटकमधील लॉक डाऊनला सोमवारपासून प्रारंभ होणार असल्याचा आदेश राज्याचे मुख्य सचिव टी .एम.विजय भास्कर यांनी बजावला आहे.
चौथ्या टप्प्यातील लॉक डाऊन दोन दिवसांचा असून त्याचा कालावधी 19 मे रोजी मध्यरात्री संपणार आहे.चौथ्या टप्प्यातील लॉक डाऊनमध्ये पूर्वीप्रमाणेच सगळे व्यवहार चालणार आहेत.
पूर्वीच्या लॉक डाऊन नियमप्रमाणेच कामकाज चालणार आहे.त्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.पहिल्या टप्प्यातील,दुसऱ्या टप्प्यातील आणि तिसऱ्या टप्प्यातील लॉक डाऊनचा कालावधी केंद्र सरकारने जाहीर केला होता.
तिसरा टप्पा संपल्यावर आता केंद्राने लॉक डाऊन बाबत निर्णय घेण्याची जबाबदारी राज्य सरकारवर सोपवली आहे.राज्यांनी आपल्या राज्यातील परिस्थिती ध्यानात घेऊन लॉक डाऊन कालावधी आणि नियमावली ठरवायची आहे.