दहावीच्या विद्यार्थिनीने तिला मिळालेली स्कॉलरशिपची रक्कम पंतप्रधान निधीला मदत म्हणून देऊन दातृत्वाचे दर्शन घडवले आहे.
श्रेया विश्वनाथ सव्वाशेरी ही बालिका आदर्श हायस्कुलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत असून तिने तिला मिळालेली स्कॉलरशिपची दहा हजार रुपयांची रक्कम कोरोना मुख्यमंत्री निधीला मदत म्हणून दिली आहे.
मदतीचा धनादेश केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी आणि पालकमंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे सुपूर्द केला.इतकेच नाही तर एक हजार मास्क देखील श्रेयाने मोफत वितरित करण्यासाठी मंत्र्यांकडे सुपूर्द केले.
श्रेया एक बुद्धिमान आणि अष्टपैलू विद्यार्थिनी म्हणून ती ओळखली जाते.
अनेक स्पर्धांमध्ये तिने बक्षिसे मिळवली आहेत.तिला अष्टपैलू विद्यार्थिनी म्हणून सरकारच्या महिला आणि बाल कल्याण विभागातर्फे दहा हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळाली होती.यापूर्वीही तिने मिळालेली बक्षिसाची रक्कम गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली आहे.