लॉक डाऊनमुळे न्यायालय बंद असल्यामुळे वकिली व्यवसाय ठप्प झाला आहे. याची दखल घेऊन कर्नाटक राज्य बार असोसिएशनतर्फे महिला वकिलांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
लॉक डाऊनमुळे न्यायालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. याचा वकिली व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. विशेष करून ज्या महिला वकिलांवर कुटुंबांची अधिक जबाबदारी आहे. तसेच ज्यांची घरची परिस्थिती ती जेमतेम आहे, अशा महिला वकिलांना आर्थिक दृष्टिकोनातून सध्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
याची दखल घेऊन कर्नाटक राज्य बार असोसिएशनतर्फे महिला वकिलांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ज्या महिला वकील 2010 सालाच्या आधीपासून वकिली व्यवसायात कार्यरत आहेत त्यांना ही मदत दिली जाणार आहे. त्यासाठी संबंधितांनी कर्नाटक बार असोसिएशनच्या वेबसाईटवर गुरुवार दि. 28 मे 2020 पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.