कोरोनामुळे संपूर्ण देश लॉक डाऊन झाले असताना आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना मात्र नित्यनेमाने आपली सेवा बजावण्यासाठी सज्ज राहावे लागत आहे. त्यामुळे सांबरा येथील अशा कार्यकर्त्यांनी अंगणवाडी कार्यकर्त्या ही 24तास सेवा बजावत असल्याचे दिसून येत आहे.
जनसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून त्यांनी अनेक नागरिकांना मास्क व सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी जनजागृती करत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न मोलाचे आहेत. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गल्लीबोळ फिरून त्यांनी अनेकांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे.
आशा अंगणवाडी व ग्रामपंचायत कर्मचारी या सार्यांनी कोरोना वर मात करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळो आणि नागरिकांनीही त्यांना सहकार्य करो. त्यामुळे कोरोनावर नक्कीच मात करता येईल. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तितके कमी आहे.
हिरे बागेवाडी येथील एका अशा कार्यकर्त्याला सेवा बजावत असताना कोरोनाची लागण झाली होती. दुसऱ्यांची सेवा करून स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या या कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. सांबरा येथील आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांचे परिश्रम वाखाणण्याजोगी आहे. असे मत तेथील ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.