सोमवारपासून बेळगावातील सगळी दुकाने बंद राहणार ,कोणालाही बाहेर पडायला दिले जाणार नाही असा एक ऑडिओ मेसेज व्हाट्सअपवर व्हायरल झाला आहे.त्यामुळे जनतेत गोंधळ निर्माण झाला आहे.तिसऱ्या टप्प्याच्या लॉक डाऊन नंतर सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत शहरातील बाजारपेठ उघडी राहत आहे.
जनताही कामानिमित्त या वेळेत बाहेर पडत आहे.असे असताना कोणीतरी खोडसाळपणा करून पोलीस खात्याच्या नावे मेसेज व्हायरल करून जनतेत निष्कारण गोंधळ निर्माण करत आहेत.सोमवारी देखील नेहमीप्रमाणे सगळे व्यवहार सुरू राहणार आहेत.त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
नेहमीप्रमाणे सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत बाजारपेठ सुरू राहील आणि जनताही आपल्या कामानिमित्त या वेळेत बाहेर पडू शकणार आहे.