केंद्र किंवा राज्य सरकार शेतकऱ्यांना पैकिज जाहीर करते. मात्र ते खरोखरच गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते काय? याचा विचार कोणीच करत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या आजोबांच्या नावे जमिनी असतात.वारसा झाला नसल्यामुळे शेतकरी असूनही अनेकांना योजनांपासून मुकावे लागत आहे. तेव्हा गावपातळीवर त्याची चौकशी करुन गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी रयत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी हे सरकारी योजनांपासून दूरच असतात. कारण त्यांना या योजनांची माहितीच नसते अनेकांच्या जमिनीच्या सात – बारा उताऱ्यावर आजोबांचीच नावे आहेत. मात्र वारसा हक्कानुसार शेतकऱ्याला जमीन दिली जाते.
मात्र त्या उताऱ्यावर नाव नसल्यामुळे शेतकरी असूनही त्याला सरकारच्या योजना मिळणे अवघड जात आहे. त्यासाठी तलाठ्याकडून माहिती घेवून शेती असलेल्या शेतकऱ्यांची नोंद करुन घ्यावी आणि त्यांनाही पंकज द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. शिरस्तेदार एम एम नदाफ यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब देसाई, नामदेव धुडूम, रामनगौडा पाटील, दुंडाप्पा पाटील, भीमू नाईक, गजानन राजाई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.