गेल्या पन्नास दिवसापासून कोरोनाशी अविरत लढा देत असलेल्या कोरोना वारियर्सवर पुष्पवृष्टी करून त्यांचे अभिनंदन केले.परिवहन ,आरोग्य,पोलीस,महानगरपालिका कर्मचारी तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींवर पुष्पवृष्टी करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
वायव्य कर्नाटक राज्य परिवहन खात्यातर्फे मध्यवर्ती बस स्थानकात कोरोना वारियर्सच्या अभिनंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.वायव्य कर्नाटक परिवहन संस्थेचे कार्यकारी संचालक राजेंद्र चोळन,जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी ,जिल्हापंचायत सीईओ डॉ के व्ही राजेंद्र,मनपा आयुक्त के एच जगदीश ,डीसीपी यशोदा वंटगोडी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी कोरोना वारियर्सवर पुष्पवृष्टी करून त्यांच्या सेवेचे कौतुक केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी व जिल्हा पंचायत सी ई ओ डॉ राजेंद्र यांच्यावर देखील आजवर त्यांनी कोरोना लढा देण्यासाठी केलेल्या कार्याचे कौतुक करून पुष्पवृष्टी करण्यात आली. या अधिकाऱ्यांचे कौतुक करून प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे .
परगावाहून आलेल्या कामगारांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी सगळ्यांनी चांगले कार्य केले आहे.आता यापुढे देखील त्याच पद्धतीने आपले कार्य सुरू ठेवूया असे आवाहन वायव्य राज्य परिवहनचे कार्यकारी संचालक राजेंद्र चोळण यांनी कोरोना वारियर्सना केले.