बांधकाम क्षेत्र खुले करा अशी मागणी वकील कामगार नेते एन आर लातूर यांनी केली आहे.
बांधकाम कामगारांसह इतर रोजंदारी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी बांधकाम क्षेत्र खुले करण्यास परवानगी द्या अशी मागणी केंद्रिय मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे.
सदानंद गौडा यांनी वकिलांशी संपर्क साधून लॉकडाऊन काळात काय केले पाहिजे, याची माहिती घेतली. त्यावेळी लातूर यांनी कामगारांची बाजू मांडत याची कल्पना मंत्र्यांना दिली आहे.
लॉकडाऊनमुळे गेल्या ४३ दिवसांपासून सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. बांधकाम तसेच इतर क्षेत्रही बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे असंघटीत कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आता बाजारपेठ खुली करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बांधकाम क्षेत्रही सुरु करण्यास परवानगी द्या असेही साकडं त्यांनी त् केंद्रिय मंत्र्यांकडे केल आहे.
केंद्रिय मंत्री सदानंद गौडा यांनी बेळगावमधील अनेक वकिलांशी चर्चा केली आहे. लॉकडाऊनच्या काळात सुरळीत व्यवहार करण्याबाबत काय करावे लागेल, याची माहिती त्यांनी घेतली आहे . बांधकाम क्षेत्रही सर्वात जास्त कामगारांना काम देणारे क्षेत्र आहे गवंडी, सेटींग पेटर, फरशी फिटींग, प्लंबर, इलेक्ट्रीशन या कामगारांना बांधकाम क्षेत्र नेहमीच तारत आले आहे. मात्र आता बांधकाम क्षेत्र बंद असल्यामुळे हे सर्व कामगार बेरोजगार झाल्याचे लातूर यांनी केंद्रीय मंत्र्यांना सांगितले.