आंबोलीहून यादगीरकडे चालत आपल्या गावी निघालेल्या 10 कामगार आणि त्यांच्या चार मुलांना बाची येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना माहिती देऊन त्यांच्या चहापान व जेवणाची सोय करून माणुसकीचे दर्शन घडवले.
पायपीट करणारे कामगार आणि त्यांची शुक्रवारी आंबोलीहून निघाले होते चालत जाताना त्यांनी मुख्य रस्त्यावरील पोलिसांची नजर टाळण्यासाठी आहेत शेतवाडीतून कच्या रस्त्यातून काटे कुटे तुडवत दिवस रात्र त्यांचे चालणे सुरूच होते.महाराष्ट्र पोलिसांना चकवा देत त्यांनी शिनोळी तुन कर्नाटक हद्दीतील बाची गावात प्रवेश केला होता त्यावेळी गावातील तरुण सचिन बाळेकुंद्री यांनी त्यांना पाहिले व त्याची माहिती गावातील पंच गुंडू गुंजीकर यांना दिली त्या नंतर गुंजीवर यांनी सीमेवर तैनात कर्नाटक पोलीस डॉक्टरांना या मजुराबाबत माहिती दिली.
आरोग्य खात्याच्या पथकाने त्या मजुरांची थर्मल स्क्रिनिंग केले त्या काळात गुंडू गुंजीवर व ग्रामस्थांनी मजुरांच्या चहापान व जेवणाची व्यवस्था केली.
नंतर पायपीट करणाऱ्या मजुरांना टेंपो मधून बेळगाव सिव्हिल इस्पितळात सोडण्यात आले.आता बेळगाव जिल्हा प्रशासन त्या मजुरांना यादगीरला पाठवण्याची सोय करणार आहे.मात्र काट्यातून पायपीट करणाऱ्या मजुरांना भोजन देत बाची ग्रामस्थांनी मात्र माणुसकीचे दर्शन घडवले आहे.सीमेच्या टोकावर असलेले या छोट्याश्या गावाने केलेला हा उपक्रम लहान असला तरी कौतुकास्पद आहे.