लॉक डाऊनच्या 60 दिवसां नंतर प्रायोगिक तत्वावर सुरू झालेल्या बेळगाव बंगळुरू रेल्वेत शुक्रवारी बंगळुरू हुन बेळगावला 176 प्रवाश्यांनी प्रवास केला आहे.शुक्रवारी सायंकाळी सात वाजता सदर ट्रेन बेळगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाली.
प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्स मार्किंग करण्यात आले होते आर पी एफ जवान माईक मधून आलेल्या प्रवाश्यांना आवाहन करत होते.शुक्रवारी सायंकाळी बंगळुरू हुन आलेली गाडी शनिवारी सकाळी 8 वाजता पुन्हा बंगळुरू कडे प्रयाण करणार असून 180 प्रवाश्यांनी बुकिंग केले आहे.
31 मे पर्यंत बेळगाव बंगळुरू ही ट्रेन आठवड्यात सोमवारी बुधवार आणि शुक्रवारी बंगळुरूहुन तर मंगळवारी गुरुवार आणि शनिवारी निघणार आहे. शुक्रवारी बेळगाव रेल्वे स्थानकावर प्लॅट फॉर्म 1 ऐवजी 3 वर गाडी आल्याने प्रवाश्यांना स्टेशन मधून लवकर बाहेर पडता आले नाही त्यामुळे ट्रेन 3 ऐवजी 1 नंबर प्लॅट फॉर्म वर यायला हवी अशी मागणी वाढलो होती.
रेल्वे खात्याने जून महिन्यात 200 ट्रेन सुरू करण्याची घोषणा केलो आहे त्यात बेळगावं वरून चार गाड्या धावणार आहेत.बेळगाव दिल्ली संपर्क क्रांती, निजामुद्दीन बेळगावं बंगळुरू एक्सप्रेस आदी ट्रेन्स सामील आहेत त्याचा फायदा बेळगावला होणार आहे.