भरतेश एज्युकेशन ट्रस्ट व स्टॅंडर्ड ट्रॅक स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या दि. 22 व 23 डिसेंबर रोजी नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर ‘संघर्ष टू रन -2022’ या मुला व मुलींसाठीच्या ॲथलेटिक्स क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर क्रीडा महोत्सव 13 वर्षाखालील गट, 16 वर्षाखालील गट, 19 वर्षाखालील गट व खुल्या गट अशा चार गटांमध्ये आयोजित केला जाणार आहे. 13 वर्षाकरिता 100 मी. धावणे, 200 मी. धावणे, 400 मी. धावणे, 600 मी. धावणे, थाळीफेक, लांब उडी.16 वर्षाकरिता 100 मी. धावणे, 200 मी. धावणे,
400 मी. धावणे, 600 मी. धावणे, 800 मी. धावणे, 1500 मी. धावणे, उंचउडी, थाळीफेक, लांबउडी, गोळा फेक,भालाफेक, 4×100 मी. रिले. 19 वर्षाकरिता 100 मी. धावणे, 200 मी. धावणे, 400 मी. धावणे, 600 मी. धावणे, 800 मी. धावणे, 1500 मी. धावणे, उंचउडी, थाळीफेक, लांबउडी, गोळाफेक, भालाफेक, तिहेरी उडी, 4×400 रिले. खुला गटाकरिता 60 मी. धावणे, 300 मी. धावणे, 600 मी. धावणे, लांबउडी,
तिहेरी उडी,भालाफेक,थाळीफेक 4×400 रिले अशा स्पर्धा राहणार आहेत . सर्वांकरिता प्रवेश फी 50 रु. आणि खुल्या गटांकरिता प्रवेश फी 100 रु. असणार आहे.
विशेष म्हणजे 14 व16 वयोगटातील स्पर्धकांसाठी हा क्रीडा महोत्सव म्हणजे राज्य संघासाठी निवड चांचणी असणार आहे. सदर क्रीडा महोत्सवातील यशस्वी क्रीडापटू पाटणा, बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक राज्यांचे प्रतिनिधित्व करतील.
सदर अथलेटिक क्रीडा महोत्सवातील स्पर्धांचे प्रथमच युट्युब चॅनेलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तरी या क्रीडा महोत्सवात भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी प्रशिक्षक प्रदीप जुवेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Daily news