22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Dec 17, 2022

मनपा आयुक्तांच्या कार्यालयासमोर माजी नगरसेवकांचे आंदोलन

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यासाठी व्हॅक्सीन डेपो मैदानाच्या परवानगी अर्जावर लेखी उत्तर देण्यास नकार देणार्‍या महापालिका आयुक्तांच्या आडमुठेपणाविरोधात म. ए. समितीच्या माजी महापौर आणि माजी नगरसेवकांनी आंदोलन केले. आयुक्तांच्या भुमिकेचा निषेध केला. अधिवेशनाविरोधात व्हॅक्सीन डेपो मैदानावर महामेळावा होणार आहे. त्यासाठी मैदानाच्या...

राष्ट्रीय स्पर्धेसाठी बेळगावच्या ‘या’ महिला क्रिकेटपटूंची निवड

भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) आयोजित देशातील 15 वर्षाखालील महिलांच्या 'वन डे ट्रॉफी 2022 -23' या राष्ट्रीय स्तरावरील एकदिवशीय क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटक राज्याच्या संघात बेळगावच्या साक्षी मुनवळ्ळी आणि श्रेया पोटे यांची निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे येत्या 26...

विजय मर्चंट स्पर्धेत सिद्धेश असलकरचे नाबाद द्विशतक

बेळगावचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना संघाचा सलामीचा फलंदाज सिद्धेश असलकर याने सध्या सुरू असलेला अरुणाचल प्रदेश क्रिकेट संघटने विरुद्धचा विजय मर्चंट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा सामना गाजवताना आज शानदार नाबाद द्विशतक झळकविले आहे. सध्या कर्नाटक राज्य क्रिकेट...

डॉ. आंबेडकर यांनी भेट दिलेल्या स्थळांचा केला जाणार विकास

घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेल्या बेळगावसह राज्यातील 10 स्थळांचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. डॉ आंबेडकरांनी भेट दिलेल्या अन्य पाच स्थळांसह संबंधित 10 स्थळांच्या विकासासाठी 20 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. भारतरत्न...

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होर्डिंग, पोस्टर्सचे संकट

बेळगाव शहरातील प्रमुख रस्ते, अंतर्गत गजबजलेला भाग आणि चौकाचौकातील बेकायदा होर्डिंग्स हटविण्याची मोहीम परिणामकारकरीत्या राबविण्यात बेळगाव महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे. महापालिकेने पोस्टर हटवा मोहीम हाती घेतली असली तरी हटवण्यात येणाऱ्या पोस्टर्सच्या तुलनेत अनेक पोस्टर्स उदयाला येत असून आता...

शिवसेनेच्या खासदारांचा बेळगाव दौरा जाहीर

बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न नियुक्त केलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष आणि इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने हे बेळगावात होणाऱ्या आगामी कर्नाटक विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्यात सहभागी होणार आहेत. खासदार धैर्यशील माने यांनी आपला बेळगाव...

आगामी विधानसभा निवडणुका बाबत पवारांना विनंती

माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रामचंद्रराव मोदगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री,समितीचे आधारस्तंभ शरद पवार यांची मुंबई मुक्कामी भेट घेतली. महाविकास आघाडीच्या मुंबई येथील महा मोर्चा संदर्भात रामचंद्र मोदगेकर हे मुंबईला गेले असता सकाळी ९ वाजता...

‘या’ बेवारस कारचे काय आहे गौडबंगाल?

पोलिसांकडे वारंवार तक्रारी करून देखील एपीएमसी मुख्य रस्त्यावर गेल्या तीन वर्षापासून धूळ खात पडून असलेली बेवारस कार अद्यापही रस्त्यावरून हटविण्यात न आल्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरातील एपीएमसी मुख्य रस्त्यावर गेल्या 2019 पासून एक निळा रंगाची कार बेवारस अवस्थेत...

22 वे मराठी बालसाहित्य संमेलन उस्फुर्त प्रतिसादात

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे आयोजित 22 वे मराठी बालसाहित्य संमेलन -2022 आज शनिवारी दुपारी कवयित्री शांता शेळके साहित्यनगरी गोगटे रंगमंदिर कॅम्प येथे प्रा. अशोक अलगुंडी यांच्या अध्यक्षतेखाली उस्फुर्त प्रतिसादात पार पडले. सालाबाद प्रमाणे परंपरेनुसार या मराठी बालसाहित्य संमेलनाचा...

अधिवेशनासाठी पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त

बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे येत्या सोमवारी 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी बेळगाव शहर परिसरात दहा दिवस 4,931 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. बेळगाव शहर परिसरातील कायदा व...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !