Tuesday, May 7, 2024

/

आगामी विधानसभा निवडणुका बाबत पवारांना विनंती

 belgaum

माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रामचंद्रराव मोदगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री,समितीचे आधारस्तंभ शरद पवार यांची मुंबई मुक्कामी भेट घेतली.

महाविकास आघाडीच्या मुंबई येथील महा मोर्चा संदर्भात रामचंद्र मोदगेकर हे मुंबईला गेले असता सकाळी ९ वाजता सिल्वर ओक येथील पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी पवार यांच्या सोबत कर्नाटकातील निवडणुका संदर्भात चर्चा झाली बेळगाव उत्तर दक्षिण ग्रामीण आणि खानापूर विधानसभा मतदार संघा बाबत पवार यांच्या सोबत सविस्तर चर्चा झाली.Modgekar pawar

 belgaum

आगामी निवडणुका साठी महाराष्ट्र एकीकरण समितीला आपला पाठिंबा,सक्रिय सहभाग,मार्गदर्शन आपली ताकत महत्वाची आहे अशी विनंती यावेळी चर्चे दरम्यान मोदगेकर यांनी केली.

आगामी काही दिवसांत कोल्हापूर किंवा मुंबईत बैठक बोलवावी अशी मागणी त्यांनी पवार यांच्याकडे केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.