Sunday, April 28, 2024

/

मंत्री, आमदारांनी शेतकऱ्यांकडे मुक्काम करावा – नायक

 belgaum

शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या समस्यांवर तोडगा काढण्याबरोबरच अधिवेशनाच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उधळपट्टी न करता आमदार आणि मंत्र्यांनी हॉटेलमध्ये न राहता शेतकऱ्यांच्या घरी राहून पाहुणाचार घ्यावा, अशी मागणी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेनेचे नेते प्रकाश नायक यांनी केली.

शहरात काल मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या समस्यांवर तोडगा काढावा. त्याचप्रमाणे कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचा ठराव अधिवेशनात संमत केला जावा.

याखेरीज अधिवेशन काळात होणारी जनतेच्या पैशाची उधळपट्टी कमी करण्यासाठी आमदार आणि मंत्र्यांनी हॉटेलमध्ये न राहता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करावा.

 belgaum

किमान यावेळी तरी निष्कारण खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या घरी राहून सर्व लोकप्रतिनिधी व उच्च पदस्थांनी अन्नदात्या शेतकऱ्यांच्या प्रति आपले प्रेम व आदरभाव दाखवावा, असे प्रकाश नायक म्हणाले. पत्रकार परिषदेस कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेनेचे अन्य नेते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.