belgaum

महात्मा फुले रोडवर महानगरपालिकेच्या वाहनांची उलट्या दिशेने

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहरातील महात्मा फुले रोडवर महानगरपालिकेची वाहने दररोज वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या मार्गावर यापूर्वी दोन ते तीन किरकोळ अपघात घडले असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. असे असतानाही महानगरपालिकेच्या वाहनांकडून उलट्या दिशेने वाहतूक सुरूच असल्याने मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आज सकाळी एका नागरिकाला महानगरपालिकेचे वाहन उलट्या दिशेने येताना दिसले. त्यावेळी संबंधित नागरिकाने वाहनाचा व्हिडिओ चित्रीकरण करून चालक आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारला. वाहतुकीचे नियम सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहेत का? महानगरपालिकेच्या वाहनांना नियम लागू नाहीत का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 belgaum

महानगरपालिकेच्या वाहनांमुळे एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिक करत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराची तातडीने दखल घेऊन उलट्या दिशेने होणारी वाहतूक थांबवावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.