बेळगाव लाईव्ह:वडगाव येथील ११०/११ केव्ही सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या विविध वीज वितरण वाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी उद्या गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर २०२६) सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याची माहिती हेस्कॉमच्या वतीने देण्यात आली आहे.
या कामामुळे एफ-७ होसूर, एफ-११ सुभाष मार्केट, एफ-४ बाजार गल्ली, एफ-५ वडगाव, एफ-१२ विद्यानगर आणि एफ-१३ भाग्यनगर या फीडरवरील वीजपुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये माधव रोड, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली खासबाग, होसूर बसवण्णा गल्ली, उप्पार गल्ली, तुळजाभवानी/तुरचर कॉलनी, शृंगेरी कॉलनी, बाडिवाले कॉलनी, जुना पी. बी. रोड (पॅटसन जवळ), येरमाळ रोड, बालकृष्ण नगर, गवळी गल्ली, पाटील गल्ली, वझे गल्ली, पाटील गल्ली, बावळे नगर, अळवन गल्ली, रामदेव गल्ली, दत्ता गल्ली, नेकार कॉलनी, मंगाई नगर, विष्णू गल्ली आणि कलमेश्वर रोड या भागांचा समावेश आहे.
तसेच गुरुदेव मंदिर रोड, धामणे रोड, वाजे गल्ली, तेगिना गल्ली, सपार गल्ली, कल्याण नगर, मलप्रभा नगर, सुभाष मार्केट, घुमटमाळ, सर्वोदय कॉलनी, रानडे रोड, आरपीडी रोड, आर. के. मार्ग १ ते ६ वा क्रॉस, आनंदवाडी, गणेश कॉलनी, संभाजी नगर, केशव नगर, येळ्ळूर रोड केएलई परिसर, अन्नपूर्णेश्वरी नगर, आनंद नगर, अनगोळ माळ, नजर कॅम्प, जेल स्कूल, पटवर्धन लेआउट, आदर्श नगर आणि गोमटेश कॉलेज परिसरातील वीजपुरवठाही खंडित राहणार आहे.
याशिवाय महालक्ष्मी कॉलनी, ओंकार नगर, विद्यानगर, सन्नड्डी कॉलनी, भाग्यनगर ४ था ते १० वा क्रॉस, पारिजात कॉलनी, अनगोळ-वडगाव रोड, अनगोळ, जेरे गल्ली, आंबेडकर गल्ली, कनकदास कॉलनी, नवहिंद सहकारी संस्था कॉलनी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी व व्यावसायिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉम ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.




