belgaum

मुतगे ग्रा. पं. कचरा डेपोमुळे ऊसाला आगएकरावरील ऊस आगीत जळून खाक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह:मुतगे गावातील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरावला गेला आहे. कचरा डेपोच्या आगीमुळे येथील शेतकरी कलाप्पा चौगुले, मारुती चौगुले आणि सुरेश चौगुले यांच्या शेतातील तब्बल एक एकर क्षेत्रातील ऊस पूर्णपणे जळून खाक झाला आहे.

मुतगे गावातील या शेतकऱ्यांच्या शेतीला लागूनच ग्रामपंचायतीचा कचरा डेपो आहे. नुकताच या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने उग्र रूप धारण करत शेजारील ऊसाच्या पिकाला आपली तीव्र झळ पोहोचवली, ज्यामुळे एक एकर क्षेत्रातील उभा ऊस जळून राख झाला आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

हा कचरा डेपो येथून इतरत्र हटवावा, यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे यापूर्वी अनेकदा निवेदने सादर करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे कायमस्वरूपी दुर्लक्ष केल्यामुळेच आज शेतकऱ्यांना आपले पीक गमावण्याची वेळ आली आहे, असा संतप्त सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

 belgaum

या संपूर्ण प्रकारानंतर सुनील अष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली बाधित शेतकऱ्यांनी मुतगे ग्रामपंचायतीला धडक देत पुन्हा एकदा निवेदन सादर केले आहे. आगीमध्ये जळून खाक झालेल्या उसाचे योग्य पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने पूर्ण नुकसान भरपाई देण्यात यावी आणि शेतकऱ्यांच्या शेताला लागून असलेला हा कचरा डेपो तातडीने हटवण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. जर या मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही, तर यापुढे कचरा डेपोच्या ठिकाणी टाकण्यात येणारा सर्व कचरा थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर टाकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी सुरेश चौगुले, कल्लाप्पा चौगुले, मारुती चौगुले, सुनील अष्टेकर, भाऊराव जाधव यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.